शेतकरी सध्या अनेक संकटांचा सामना करत आहेत. यामुळे ते सरकारविरोधात रस्त्यावर उतरत आहेत. यावर्षी मुसळधार पावासामुळं राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झाले आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे तर काहींच्या जमिनी देखील वाहून गेल्या. यामुळे शेतकरी मदतीची मागणी करत आहेत.
यामध्ये हिंगोली जिल्ह्याला देखील या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला होता. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सरकारने नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत देण्याचे जाहीर केले होते. असे असताना मात्र हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील तीन मंडळांना मदत मिळणार नाही.
यामुळे गेल्या सहा दिवसापासून शेतकरी गोरेगाव येथील शेतकरी संपावर गेले आहेत. आता हे संपावर असलेले शेतकरी आक्रमक झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. पावसाने झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य शासनाच्या वतीने हेक्टरी 13 हजार 500 रुपये मदत जाहीर करण्यात आली होती.
लम्पी व्हायरस पाकिस्तानातून आला, तो मानवनिर्मित, रामदेवबाबांचा दावा
असे असताना सेनगाव तालुक्यातील तीन मंडळांना मदतीपासून वंचित रहावे लागत आहे. या भागामध्ये अतिवृष्टी झाली नसल्याने पिकांचे नुकसान झाले नसल्याचा अजब दावा प्रशासनाने केला आहे. यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. यामुळे येथील शेतकरी संपावर गेले आहेत.
कामाची बातमी! ऊस वाहतुकीसाठी बैलांचे लसीकरण करणे बंधनकारक, साखर आयुक्तांचा निर्णय..
येथील शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध फेकत राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला. मदतीपासून वंचित असलेल्या या गावांचा तत्काळ नुकसानग्रस्त असलेल्या गावांच्या यादीत समावेश करावा. आणि शेतकऱ्यांना मदत मिळवून त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे. यामुळे आता प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
'FRP चा रुपयाना रुपया जोपर्यत शेतकऱ्यांना मिळत नाही, तोपर्यंत एकही कारखाना सुरु होऊ देणार नाही'
'नको म्हटलं तरी पीएम किसान सन्मान निधी माझ्या खात्यावर जमा'
'वारंवार सांगूनही माझ्या खात्यावर पैसे यायचे थांबत नाहीत आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांनी हेलपाटे घातले तरी त्यांचे पैसे येत नाहीत'
Share your comments