1. बातम्या

'FRP चा रुपयाना रुपया जोपर्यत शेतकऱ्यांना मिळत नाही, तोपर्यंत एकही कारखाना सुरु होऊ देणार नाही'

गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) ऊस दरावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. आता यंदाचा गळीत हंगाम जाहीर झाला मात्र मागील वर्षीच्या थकीत FRP चं काय? असा खडा सवाल शेट्टींनी राज्य सरकारला केला आहे. यामुळे आता यावरून पुन्हा एकदा सरकार विरुद्ध शेतकरी असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
sugarance

sugarance

गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) ऊस दरावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. आता यंदाचा गळीत हंगाम जाहीर झाला मात्र मागील वर्षीच्या थकीत FRP चं काय? असा खडा सवाल शेट्टींनी राज्य सरकारला केला आहे. यामुळे आता यावरून पुन्हा एकदा सरकार विरुद्ध शेतकरी असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

थकीत 900 कोटींसह, 200 रुपये अधिकचे मिळेपर्यंत राज्यातील एकही साखर कारखाना सुरु होऊ देणार नसल्याचा इशारा शेट्टींनी दिला आहे. मागील वर्षी कारखान्यांना इथेनॉल विक्रीतून मोठ्या प्रमाणात नफा झाला होता. यावर देखील ते म्हणाले, 200 रुपये अधिक देण्याची कारखान्यांची क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले.

आधी थकीत रक्कम द्या आणि मग कारखाने सुरु करा अन्यथा शेतकऱ्यांच्या संघर्षाला सामोरे जा. दरम्यान, 15 ऑक्टोबरपासून राज्य सरकारने ऊसाचा गळीत हंगाम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, साखर कारखान्यांकडे 900 कोटी रुपयांची FRP (Fair & Remunerative Price) थकीत आहे. त्या थकीत FRP चं काय? असा सवाल राजू शेट्टींनी केला आहे.

राज्याचा यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा..

FRP चा रुपयाना रुपया जोपर्यत शेतकऱ्यांना मिळत नाही, तोपर्यंत राज्यातील एकही साखर कारखाना सुरु होऊ देणार नसल्याचे राजू शेट्टी म्हणाले. दरम्यान, इथेनॉलमुळं रोख पैसे उपलब्ध झाल्यामुळं साखर कारखान्यांकडे FRP शिवाय 200 रुपये ज्यादा देण्याची क्षमता तयार झाली आहे. हे पैसे जोपर्यंत मिळणार नाहीत तोपर्यंत ऊस उत्पादक आणि कारखानदार हा संघर्ष चालणार आहे.

प्रगतशील शेतकऱ्यांकडून कृषी जागरणाच्या ऑफिसला भेट, शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाचे केले कौतुक..

दरम्यान, 15 ऑक्टोबरपासून राज्य सरकारने ऊसाचा गळीत हंगाम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता या दरावर काय निर्णय होणार याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
'नको म्हटलं तरी पीएम किसान सन्मान निधी माझ्या खात्यावर जमा'
कामाची बातमी! ऊस वाहतुकीसाठी बैलांचे लसीकरण करणे बंधनकारक, साखर आयुक्तांचा निर्णय..
लम्पी व्हायरस पाकिस्तानातून आला, तो मानवनिर्मित, रामदेवबाबांचा दावा

English Summary: factory will allowed farmers get rupee after rupee FRP Published on: 20 September 2022, 03:05 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters