
Government one day for Baliraja, other days to break MLA (image google)
सरकारचा एक दिवस बळीराजासाठी अन् बाकीचे दिवस आमदार फोडण्यासाठी असतात, अशा शब्दात काॅंग्रेस बाळासाहेब थोरात यांनी सरकाराला घेरण्याचा प्रयत्न केला. सध्या अधिवेशनाला सुरूवात झाली.
या अधिवेशनाच्या सुरुवातीपासून विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली. आज सरकारच्यावतीने कृषीचा प्रस्ताव मांडण्यात आला.
काॅंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर हल्ला चढवला. ते म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांवर कमी पाऊस, बोगस बियाणे, दुबार पेरणीचे संकट आहे. अशा वेळी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उदासीनता आहे.
वीजबिलातील सवलतींचा लाभ घ्यावा, महावितरणचे आवाहन...
खरीप हंगाम सुरू झाला आहे. पण राज्यात अजून पाऊस न झाल्याने पेरण्या रखडल्या आहेत. विदर्भ-मराठवाड्यातील काही भागात थोड्या प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत. राज्यभरात बोगस बियाणांचा काळाबाजार सुरू आहे.
आता बोगस बियाणे, खते रोखण्यासाठी कडक कायदे, राज्य सरकारची मोठी घोषणा..
गारपीठ-अतिवृष्टीची अजून नुकसान भरपाई मिळाली नाही. कांद्याचे ३५० रुपये अनुदानाचे जाहीर केले. पण शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, दुबार पेरणीचे संकट आले आहे. असेही थोरात म्हणाले.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा १४ वा हफ्ता कधी जमा होणार? अखेर तारीख आली समोर..
मागेल त्याला शेततळे व मागेल त्याला ड्रीप, शेडनेट यांचे प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढा, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे आदेश
विषारी वैरण गायींनी खाल्ल्यामुळे चार गायींचा गोठ्यात तडफडून मृत्यू झाला..
Share your comments