1. कृषीपीडिया

घुंगर्डे हदगाव येथे माझा एक दिवस माझ्या बळीराजा साठी अभिनव उपक्रम

घुंगर्डे हदगाव येथे आणि अंबड तालुक्यामध्ये कृषि विभाग अंबड

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
घुंगर्डे हदगाव येथे माझा एक दिवस माझ्या बळीराजा साठी अभिनव  उपक्रम

घुंगर्डे हदगाव येथे माझा एक दिवस माझ्या बळीराजा साठी अभिनव उपक्रम

घुंगर्डे हदगाव येथे आणि अंबड तालुक्यामध्ये कृषि विभाग अंबड यांच्या वतीने माझा एक दिवस माझ्या बळीराजा साठी हा राबविण्यात आला. सदरील या उपक्रमासाठी कृषि विज्ञान केंद्र बदनापूर येथील विषय तज्ञ डॉ. सचिन सोमवंशी, डॉ.ज्ञानदेव मुटकुळे आणि तालुका कृषि अधिकारी अंबड श्री. सचिन गिरी यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती लाभली.शेतकरी बांधव यांना दैनंदिन शेती कामामध्ये येणाऱ्या अडचणी, विविध खरीप पिके आणि फळपिके यांच्या

किड रोग नियंत्रनासाठी येणाऱ्या अडचणी, पिकातील मूल्य वर्धन Challenges for Kid Disease Control, Crop Value Addition  आणि मूल्य साखळी विकास या बाबत सखोल मार्गदर्शन आणि चर्चा करून मोसंबी फळबागेतील फळगळ नियंत्रण, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, खरीप पिकातील कमी खर्चातील पिक उत्पादन तंत्रज्ञान, पिकातील स्वतः सूक्ष्म निरीक्षण करून किड रोग प्रादुर्भाव ओळखून कामगंध सापळे,सापळा पिके, मिश्रपीक,जैविक मित्र कीटक, बुरशी यांचा वापर,पक्षी थांबे एकात्मिक

किड रोग व्यवस्थापन तसेच शेतकरी बांधव यांनी फवारणी करताना घ्यावयाची काळजी बाबत प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन करण्यात आले, कृषि विभागातील विविध योजना, ई पिक पाहणी आणि पि. एम. किसान ई के वाय सी करणे, महा डी बी पोर्टल वर एस. सी. व एस टी प्रवर्गातील शेतकरी यांनी अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आहे आणि दिवस भरात शेतकरी बांधव आणि अधिकारी यांच्या उपक्रमतून विविध

अडचणी,नैराश्य,उदासीनता यातून बाहेर पडून नवीन उत्साहाने आपल्या शेती कामामध्ये मनोबल वाढवण्यासाठी साठी उपक्रम राबविला..उपक्रमास कृषि सहाय्यक श्री गोवर्धन उंडे, श्री. लहू क्षीरसगर, शेतकरी बांधव,श्री. राजेंद्र चोरमले उपसरपंच श्री. कृष्णासिंग पवार, वि.वि.का.स.सो. चेरमन श्री. प्रल्हाद सिंग परीहार, शिवाजी मस्के, शिवाजी शिंगटे, नामदेव मोटे, ज्ञानेश्वर देशमुख, परमेश्वर जोडणार, सावता काळे, राजुसिंग पवार, भाऊसिंग पवार, अर्जुन घोलप आणि बहुसंख्य शेतकरी बांधव यांची उपस्थिती दर्शवली...

English Summary: My one day at Ghungarde Hadgaon is an innovative activity for my Baliraja Published on: 03 September 2022, 05:47 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters