MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

किसान क्रेडिट कार्डवरील मर्यादा वाढली ; मिळणार ३ लाख रुपयांचे कर्ज

केंद्र सरकारने कोरोनाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना एक दिलासादायक बातमी दिली आहे. सरकार आता शेतकऱ्यांना विना गारंटी कर्ज देणार आहे. शेतकऱ्यांना वेळेवरीत पैशाची उपलब्धता व्हावी यासाठी सरकारने किसान क्रेडिट कार्डची सुविधा चालू केली आहे. या कार्डच्या साहाय्यातून शेतकरी शेतीसाठी लागणारी साधने विकत घेऊ शकत होता.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


केंद्र सरकारने कोरोनाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना एक दिलासादायक बातमी दिली आहे. सरकार आता शेतकऱ्यांना विना गारंटी कर्ज देणार आहे. शेतकऱ्यांना वेळेवरीत पैशाची उपलब्धता व्हावी यासाठी सरकारने किसान क्रेडिट कार्डची सुविधा चालू केली आहे. या कार्डच्या साहाय्यातून शेतकरी शेतीसाठी लागणारी साधने विकत घेऊ शकत होता. परंतु सरकारने विशेष योजना ऑफर या कार्डमध्ये दिल्या आहेत. काही दिवसांपुर्वी आरबीायने या किसान क्रेडिट कार्डमधील रक्कम घरगुती खर्चासाठी घेऊ शकतो यासाठी सूट दिली होती. आता सरकारने अजून एक ऑफर दिली आहे, यातून शेतकऱ्यांची मोठी आर्थिक मदत होणार आहे.

किसान क्रेडिट कार्डमधून शेतकऱ्यांना आधी फक्त १ लाख ६० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मिळत होते. परंतु सरकारने ही मर्यादा वाढवली असून शेतकऱ्यांना या कार्डमधून ३ लाख रुपयांचे कर्ज मिळू शकणार आहे. पशुपालन आणि डेअरी विभागाने वित्त सेवा विभागासह पहिली अधिसुचना आणि केसीसी एप्लीकेशन फॉर्मट जारी केले आहेत. सदर अधिसुचना आणि केसीसी एप्लीकेशन फॉर्मेट सर्व राज्यातील दूध संघ फेडरेशन आणि दूध संघटनांना पाठविण्यात आले असून याला मिशन मोडवर लागू करण्यास सांगितले आहे.  प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेतेर्गंत किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना दिले जात आहेत.

आधी विना तारण किंवा गांरटीने एक लाखापर्यंतचे कर्ज कार्डद्वारे दिले जात होते. त्यानंतर याची मर्यादा वाढविण्यात आली ही रक्कम ६० हजाराने वाढवली. आता पर्यंत कर्जाची मर्यादा वाढविण्यात आली असून आता ती ३ लाख करण्यात ाली आहे. या कर्जासाठी शेतकऱ्यांना ४ टक्क्यांनी व्याज द्यावे लागते. शेतीसाठी घेण्यात येणारे कर्ज हे ९ टक्के व्याजाने मिळते. परंतु किसान क्रेडिट कार्डने कर्ज घेतल्यास सरकार व्याजात २ टक्के अनुदान देत असते.  ज्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड घ्यायचे असेल तर आपण डे https://pmkisan.gov.in/ या लिंकवर क्लिक करावी.  थेट बँकेत जाऊन ही आपण कार्डसाठी अर्ज करू शकता. जर पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर आपल्याला अधिक कागदपत्रे देण्याची गरज नाही.

English Summary: government increased kisan credit card's limit ; now farmer can get 3 lakhs loan Published on: 04 June 2020, 05:24 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters