पीक गहू हे रबी हंगामातील प्रमुख असून यावर्षी गव्हाला चांगला भाव मिळत आहे. त्याला बरीचशी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील परिस्थिती देखील कारणी भूत आ हे.
गहू उत्पादनाच्या बाबतीत भारतातील राज्यांचा विचार केला तर पंजाब राज्य हे अग्रस्थानी आहे. याच पंजाब मध्ये गव्हाचे सोने मोती या वाणाची लागवड केली जाते. हे एक गव्हाचे जुने वाण असून लोकांच्या पसंतीस उतरलेले हे वाण आहे. पंजाब मधील शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या या सोने मोती गव्हाच्या वानाला इतर जातींच्या गव्हाच्या वानाच्या चार पट अधिक भाव मिळत आहे. पंजाब मध्ये सोने मोती वानाच्या गव्हाच्या भावामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून सध्या खुल्या बाजारपेठेत आठ हजार रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळत आहे. आरोग्याच्या दृष्टीने जागृत असलेले नागरिक या वानाच्या गहू खरेदीला पसंती देतात. या गव्हाला खरेदी करण्यासाठी ग्राहक पेरणी जेव्हा केली जाते तेव्हाच ग्राहकांकडून बुकिंग केला जातो. द ट्रिब्युनच्या एका अहवालानुसार, खन्ना येथील बहोमजरा गावातील हरपाल सिंग भट्टी या शेतकऱ्याने दहा शेतकऱ्यांचे उत्पादक गट तयार केले असून ते तीस एकरामध्ये सोने मोती या वाणाचे उत्पादन घेतात.
या गटाला दरवर्षी बक्षीस मिळते. या वाना विषयी बोलताना भट्टी यांनी म्हटले की, यावर्षी सोन्या मोती गहू आठ हजार रुपये क्विंटल विकला गेला आहे. सध्या गव्हाच्या हमीभावाचा विचार केला तर तो दोन हजार पंधरा रुपये प्रति क्विंटल इतका असून यावर्षी वाढत्या तापमानामुळे गव्हाच्याउत्पादनात घट आली आहे.एकरी आठ क्विंटल मिळणारा उतारा चक्क सहा क्विंटल वर येऊन ठेपला आहे. पंजाब मध्ये लोकप्रिय असलेले गव्हाचे सोने मोती हेवान आता महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये देखील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. याचा एकरी उत्पादन याचा विचार केला तर ते 8 क्विंटल पर्यंत मिळते. गव्हाचे इतर जे लोकप्रिय वान आहेत त्यापासून एकरी 20 ते 21 क्विंटल उत्पादन मिळते परंतु शेतकरी अजूनही सोने मोत्या पासून एम एस पी वर इतर गव्हाच्या विक्रीतून जितका पैसा कमावतो तितका कमावत असल्याचे द ट्रीबूनने आपल्या अहवालात प्रसिद्ध बीजरक्षक डॉ.प्रभाकर राव यांनी म्हटले आहे..
सोना मोत्याचे वैशिष्ट्ये
हे पंजाब मधील अनेक वर्षापासून प्रचलित असलेले वाण असून यामध्ये ग्लूटेन चे प्रमाण खूप कमी असते.
तसेच गव्हाच्या या जातीमध्ये ग्लायसेमिक चे प्रमाण आणि फॉलिक ऍसिड चे प्रमाण जास्त असते. गव्हाची ही जात उच्च पौष्टिक गुणधर्मासाठी ओळखली जाते. त्यामुळे ग्राहकांकडून अगदी जास्त भावात देखील याची खरेदी केली जाते. (स्त्रोत-tv9मराठी)
महत्वाच्या बातम्या
Share your comments