1. बातम्या

असे काय झाले असेल? अगदी काही तासांपूर्वी 54 शेळ्या आणल्या विकत अन काही कळायच्या आत दगावल्या एकामागून एक

शेतकरी म्हटले म्हणजे असंख्य असंख्य संकटांना तोंड देऊनघट्ट पाय रोवून उभा राहणारे व्यक्तिमत्व होय. मग ते नैसर्गिक संकट असो की बऱ्याचदा मानवनिर्मित संकट एकामागोमाग शेतकऱ्यांवर बरसत असतात.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
symbolic image

symbolic image

शेतकरी म्हटले म्हणजे असंख्य असंख्य संकटांना तोंड देऊनघट्ट पाय रोवून उभा राहणारे व्यक्तिमत्व होय. मग ते नैसर्गिक संकट असो की बऱ्याचदा मानवनिर्मित संकट एकामागोमाग शेतकऱ्यांवर  बरसत असतात.

परंतुपर्वताप्रमाणे अचलशेतकरी राजा कायम स्थिर असतो.पण म्हणतात नाशेतकऱ्यांच्या जीवनात अशा काही घटना घडतात.तेव्हामनामध्ये विचार येतो कि असे शेतकऱ्यांच्या बाबतीतच का घडते? मन अशा घटना ऐकून एकदम सुन्न होते. अशीच एक घटना सध्या इंदापूर मधून समोर येत आहे. याबद्दल सविस्तर माहिती अशी की, शेतीला जोडधंदा म्हणून इंदापुरातील दोन युवकांनी शेळी पालन व्यवसाय सुरू केला. नितीन पांढरे व अतुल घोडके अशा या तरुणाचे नाव असून शेळीपालन व्यवसाय सुरू करताना त्यांनी जिल्ह्यातील आठवडी बाजारा मधूनशेळ्या आणि बोकडांचे खरेदी केली होती. एका शेळी पासून सुरू केलेला त्यांचा व्यवसाय त्यांनी 54 शेळी पर्यंत नेऊन पोचवला होता. परंतु नियतीला ते मान्य नव्हते असेच म्हणावे लागेल. रविवारी रात्री एक तासाच्या आत मध्ये या सगळ्या शेळ्या दगावण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अचानक आलेल्या संकटामुळेया दोघा तरुण शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. शेळ्या का दगावत आहेत हे लक्षात येण्या अगोदरच एकामागून एक अशा सगळ्या शेळ्या दगावले आहेत.

परंतु आता या तरुण शेतकऱ्यांचे याबाबतची मेहनत आणि भविष्यकालीन स्वप्ने सगळे काही मातीमोल झाले आहे. पारंपारिक शेती करत असताना काहीतरी नवीन करावे असा निश्चय करुन दोघांनी शेळीपालन व्यवसाय अथक परिश्रम घेऊन सुरू केला होता. मोठ्या कष्टाने उभा केलेला हा व्यवसाय अगदी काही मिनिटातसंपल्याने या दोघांवर काय परिस्थिती ओढवली असेल ह्याचा विचार सुद्धा करवत नाही.

 यापैकी चार शेळ्याचे शवविच्छेदन        

 अचानकपने शेळ्या का दगावल्या? याचे कारण कुणाचेच लक्षात आले नसून हा नेमका प्रकार काय आहे  हे देखील कोणाला अजून पर्यंत कळले नाही. घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी दाखल झाल्यानंतर त्यांनी प्राथमिक तपासणी करून त्यातील 4 शेळ्यांचा मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी पुणे येथे प्रयोगशाळेत पाठवून दिले आहेत. त्यामुळे सध्या तरी हा कसा प्रकार घडला त्याबद्दल कुणालाच काही सांगता येणार नाही.

आता पुणे येथून शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच  या शेळ्यांच्या दगावल्या मागील नेमके कारण काय आहे? हे कळू शकेल.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Weather Maharashtra: असनी चक्रीवादळ उद्या ओडिसा आणि आंध्रमध्ये दाखल होणार; महाराष्ट्रात या ठिकाणी बरसणार पावसाच्या सऱ्या

नक्की वाचा:राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! सातवा वेतन आयोगाचा थकबाकीचा तिसरा हप्ता लवकरच मिळणार

नक्की वाचा:दीर्घायुष्याचा फार्मुला: जेवणाशी संबंधित असलेल्या संशोधनात पुढे आलेले निष्कर्ष, वाचा महत्वाची माहिती

English Summary: in indapur tragic event occurs 54 goat to perish in one time farmer so loss Published on: 10 May 2022, 09:46 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters