केंद्र व राज्य सरकार (Central and State Govt) सर्वसामान्य लोकांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यातून लोकांना आर्थिक लाभ घेता येईल. आता रेशनकार्ड धारकांसाठी उत्तराखंड सरकारने एक दिलासा देणारी बातमी दिली आहे.
सरकारने रेशनकार्ड असणाऱ्यांना दरवर्षी मोफत एलपीजी सिलिंडर (LPG cylinder) देण्याची घोषणा केली आहे. देशात अनेक वस्तू महाग झाल्या असून त्यांचा थेट बोजा स्वयंपाकावरील खर्चावर पडला आहे. त्याच पार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकारने हा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा
Post Office: आता पोस्ट ऑफिसमध्ये होणार पीक विम्याची नोंदणी; शेतकऱ्यांना दिलासा
महत्वाचे म्हणजे सरकारच्या या योजनेअंतर्गत पात्र व्यक्तींना वर्षभरात 3 गॅस सिलिंडर (cylinder) मोफत मिळू शकतात. उत्तराखंड सरकारने या वर्षी मे महिन्यात अंत्योदय कार्डधारकांना 3 एलपीजी सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला होता.
हे ही वाचा
Bank Holiday: ग्राहकांनो बँकेतील कामे आजच उरकून घ्या; ऑगस्टमध्ये 17 दिवस राहणार बँका बंद
55 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार
मोफत एलपीजी गॅस योजनेचा एकूण 55 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार (State Govt) उचलणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांना माहिती देताना मुख्य सचिव सुखबीर सिंग संधू म्हणाले की, एकूण 1,84,142 अंत्योदय कार्डधारकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
विशेष म्हणजे मंत्रिपरिषदेने मागील वर्षीप्रमाणेच गहू खरेदीवर शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २० रुपये बोनस देण्याचा निर्णयही घेतल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र या योजनेचा लाभ घेयचा असेल तर लाभार्थी उत्तराखंडचा रहिवासी असणे अनिवार्य आहे. उत्तराखंड सरकार येथील सर्वसामान्य लोकांना चांगली मदत करत आहे.
महत्वाच्या बातम्या
Agriculture Officer: ...आणि कृषी अधिकारी लाच घेताना जाळ्यात अडकला; वाचा नेमकं काय झालं
Business: शेतकरी मित्रांनो 85 % अनुदानासह सुरू करा 'हा' व्यवसाय; पहा सरकारची जबरदस्त योजना
Post Office Scheme: भारीच की! पोस्टाने आणली 'ही' जबरदस्त परतावा योजना; घ्या आजच लाभ
Share your comments