1. आर्थिक

Bank Holiday: ग्राहकांनो बँकेतील कामे आजच उरकून घ्या; ऑगस्टमध्ये 17 दिवस राहणार बँका बंद

बँक कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या सणासुदीचा हुंगाम सुरु होत आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये अनेक सण येतात. या सणाचे बँक कर्मचाऱ्यांना नियमानुसार अनेक सुट्ट्या दिल्या जातात. त्यामुळे आता ऑगस्ट महिन्यात बँक कर्मचाऱ्यांना सुट्ट्याच सुट्ट्या मिळणार आहेत.

bank transactions

bank transactions

बँक कर्मचाऱ्यांसाठी (Bank employees) एक आनंदाची बातमी आहे. सध्या सणासुदीचा हुंगाम सुरु होत आहे. या सणाचे बँक कर्मचाऱ्यांना नियमानुसार अनेक सुट्ट्या दिल्या जातात. त्यामुळे आता ऑगस्ट (august) महिन्यात बँक कर्मचाऱ्यांना सुट्ट्याच सुट्ट्या मिळणार आहेत.

ऑगस्टमध्ये रक्षाबंधन, जन्माष्टमी, गणेश चतुर्थी तसेच स्वातंत्र्य दिन सारखे मोठे सण आहेत. नुकतेच RBI कडून ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची (Bank Holiday) यादी जाहीर करण्यात आली आहे.

ऑगस्ट महिन्यात शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांसह एकूण 17 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे ऑगस्टमध्ये बँकेशी संबंधित काही काम असेल तर आपल्या बँकेच्या सुट्ट्यांची माहिती जाणून घ्या. जेणेकरून तुम्हांला आपले काम वेळेत आटपता येतील.

हे ही वाचा 
LPG Subsidy: एलपीजी सबसिडीबाबत सरकारची जबरदस्त योजना; जाणून घ्या कोणाला मिळणार सबसिडी

महत्वाचे म्हणजे या सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये एकाच वेळी लागू होणार नाहीत. RBI च्या अधिकृत वेबसाइटवरील सुट्ट्यांच्या यादीनुसार, बँकांच्या या सुट्ट्या प्रत्येक राज्यांमध्ये साजरे होणारे सण किंवा त्या राज्यांमधील विशेष प्रसंगांवर देखील अवलंबून असतात. महितीनुसार प्रत्येक राज्यांमध्ये वेगवेगळ्या सुट्ट्या मिळतील.

हे ही वाचा 
Cotton Production: कापूस संशोधन संस्थेचा मोठा निर्णय; आता कापसाच्या उत्पादनात होणार वाढ

बँकांच्या सुट्ट्यांची लिस्ट खालीलप्रमाणे

1 ऑगस्ट 2022 - द्रुपका शे-जी उत्सव (गंगटोकमध्ये बँका बंद राहतील)

7 ऑगस्ट 2022 - पहिला रविवार

8 ऑगस्ट 2022 - मोहरम (जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँकांना सुट्टी असेल)

9 ऑगस्ट 2022 - चंदीगड, गुवाहाटी, इंफाळ, डेहराडून, शिमला, तिरुवनंतपुरम, भुवनेश्वर, जम्मू, पणजी, शिलाँग वगळता देशभरात बँका बंद राहतील.

11 ऑगस्ट 2022 - रक्षाबंधन (अहमदाबाद, भोपाळ, डेहराडून, जयपूर शिमल्यामध्ये सुट्टी असेल)

12 ऑगस्ट (कानपूर लखनऊमध्ये बँका काम करणार नाहीत)

13 ऑगस्ट 2022 - दुसरा शनिवार

14 ऑगस्ट 2022- रविवार

15 ऑगस्ट 2022 - स्वातंत्र्य दिन

16 ऑगस्ट 2022 - पारशी नववर्ष (मुंबई आणि नागपूरमध्ये बँकेला सुट्टी)

18 ऑगस्ट 2022 - जन्माष्टमी (भुवनेश्वर, कानपूर, डेहराडून, लखनौ येथे बँकांना सुट्टी असेल)

19 ऑगस्ट 2022 (अहमदाबाद, भोपाळ चंडीगड चेन्नई गंगटोक, जयपूर जम्मू, पाटणा रायपूर रांची, शिलाँग, शिमला आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील)

20 ऑगस्ट 2022 - हैदराबादमध्ये बँका बंद राहतील.

21 ऑगस्ट 2022 - रविवार.

28 ऑगस्ट 2022- रविवार.

29 ऑगस्ट 2022 - (गुवाहाटीमध्ये सुट्टी).

21 ऑगस्ट 2022 - गणेश चतुर्थी (गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये बँका बंद राहतील) Bank Holiday

बँक कर्मचाऱ्यांना अधिक माहिती हवी असल्यास https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx या वेबसाईटला भेट द्या.

महत्वाच्या बातम्या 
Business: शेतकरी मित्रांनो 85 % अनुदानासह सुरू करा 'हा' व्यवसाय; पहा सरकारची जबरदस्त योजना
Post Office Scheme: भारीच की! पोस्टाने आणली 'ही' जबरदस्त परतावा योजना; घ्या आजच लाभ
Agriculture Department: कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मोठे आवाहन; शेतकरी मित्रांनो करा आजच 'हे' काम

English Summary: bank transactions today Banks remain closed August Published on: 27 July 2022, 02:43 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters