यंदा अतिरिक्त उसामुळे अनेकांचे ऊस अजूनही तुटले गेले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. असे असले तरी यंदा विक्रमी गाळप झाले आहे. यामुळे साखरेचे उत्पादन देखील जास्त झाले आहे. विक्रमी गाळपामुळे (Record Crushing) शेतकऱ्यांना एफआरपीपोटी (FRP) मिळणारी रक्कम ४२ हजार कोटी रुपयांच्या आसपास असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. यामुळे हा आकडा खूपच मोठा आहे.
असे असले तरी मराठवाड्यात शेतकऱ्याची झोप उडाली आहे. याठिकाणी केवळ शिल्लक उसाचीच चर्चा आहे. अनेकजण ऊस पेटवून देत आहेत. शिल्लक ऊस केवळ १९ लाख टनाच्या आसपास आहे. तो पुढील काही दिवसांत पूर्णतः गाळला जाईल की नाही याची धास्ती शेतकऱ्यांना आहे. यामुळे याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
राज्यात आतापर्यंत १३१२ लाख टनांपेक्षा जास्त उसाचे गाळप झाले आहे. यंदा ४२ हजार कोटीची एफआरपी मिळेल. राज्यात अजून केवळ ८ लाख टनाच्या आसपास ऊस गाळपाविना उभा आहे. त्याचे तातडीने गाळप होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आता हार्वेस्टर अधिगृहीत करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. यामुळे तो लवकरात लवकर संपवण्याचे आवाहन प्रशासनापुढे आहे.
अतिरिक्त उसावर आता प्रशासनही हतबल, आता ऊस फडातच राहणार? पहा आकडेवारी
मे अखेर बहुतेक सर्व ऊस गाळला जाईल. तरीही ऊस राहिलाच तर जूनच्या पहिल्या आठवड्यातसुद्धा कारखाने सुरू ठेवण्याचे नियोजन झाले आहे. मात्र पावसाळा लवकर सुरु झाला तर अनेक अडचणी वाढणार आहेत. यामुळे ज्याचा ऊस राहिला आहे. त्यांची पळापळ सुरु आहे. यंदा महाराष्ट्राची उलाढाल एक लाख कोटीपर्यंत गेली आहे. शेतकरी, साखर कारखान्यांचे जाळे आणि राज्य शासनाची यंत्रणा यांच्यातील उत्तम समन्वयातून ही कामगिरी साधली गेली आहे.
वाढलेले दुधाचे दर केंद्राला बघवेनात, केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे दूध दरात कपात
यावर्षी एफआरपी वाटप ४२००० कोटी, इथेनॉल ९००० कोटी, सहवीज ६००० कोटी, रेक्टिफाइड स्पिरीट ५००० कोटी, मद्यनिर्मिती १२००० कोटी, यंत्रसामग्रीमधील गुंतवणूक ६००० कोटी, साखर निर्यात ३५०० कोटी अशाप्रकारे खर्च झाला आहे. शेतकऱ्यांना यंदा मिळणारा रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) विक्रमी स्वरूपाचा असेल.
महत्वाच्या बातम्या;
अजितदादांच्या शेतीविषयक अभ्यासामुळे अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ, अधिकाऱ्यांपुढे प्रश्नांचा पाऊस..
शेताला कुंपण घालण्यासाठी सरकार देणार 48 हजार रुपये, जनावरांपासून होणार सुटका
दुचाकी चारचाकी खरेदी करायची असेल तर 1 जून आधी करा, किमतीमध्ये होणार मोठी वाढ
Share your comments