1. बातम्या

शेतकऱ्यांना FRP न देणाऱ्या या १० कारखान्यांवर होणार कारवाई

१० कारखान्यांवर होणार कारवाई

१० कारखान्यांवर होणार कारवाई

शेतकऱ्यांना उसाची रास्त व किफायतशीर किंमत (एफआरपी) न देणाऱ्या कारखानदारांचे धाबे दणाणले आहेत. कारण दहा कारखान्यांना महसुली वसुली प्रमाणपत्र (आरआरसी) नोटिसा पाठवण्यात येणार असून आतापर्यंत १९ कारखान्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. या कारखान्यांकडून सुमारे ६५६ कोटी रुपये वसूल होतील, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.
'आगामी वर्षात ऊस लागवडीचे क्षेत्रफळ आणखी वाढणार आहे. सुमारे १२ लाख हेक्‍टर क्षेत्रफळावर ऊस लागवड होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. द्राक्ष, सोयाबीन आणि डाळिंब ही पिके अडचणीत आल्यामुळे संबंधित शेतकरी हे ऊस पिकाची लागवड करण्याची शक्यता आहे,' अशी माहितीही गायकवाड यांनी यावेळी दिली.

 

शेतकऱ्यांसाठी खूशखबर, एफआरपीत वाढ होण्याची शक्यता

'या वर्षी साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती केली असल्याने साखरेचा गाळप उतारा १०.५० टक्के आहे. इथेनॉल निर्मितीसाठी वापरण्यात आलेल्या उसाच्या रसाची किंमत काढून त्याचा समावेश करण्यात येणार असल्याने साखरेचा सरासरी गाळप उतारा वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या एफआरपीमध्ये आणखी वाढ होईल,' असा अंदाज शेखर गायकवाड यांनी वर्तवला आहे. तसंच राज्यात यंदाच्या गाळप हंगामात उसाचे १०१२ लाख टन गाळप होऊन १०६.३० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदाचा गाळप हंगाम संपला असून, सुमारे २०८ दिवस कारखान्यांमध्ये गाळप सुरू होते. यावर्षी सर्वधिक १९० कारखान्यांनी गाळप घेतले. साखरेचा सरासरी गाळप उतारा हा १०.५० टक्के झाला आहे, असंही गायकवाड यांनी सांगितलं.

हेही वाचा: ऊस शेतीमध्ये सूर्यप्रकाशाचा कसा करुन घ्याल कार्यक्षम वापर

कोणत्या साखर कारखान्यांना पाठवणार नोटीस?

कारवाईदरम्यान कोणत्या साखर कारखान्यांना महसुली वसुली प्रमाणपत्र (आरआरसी) नोटिसा येत्या सोमवारपर्यंत पाठवल्या जाणार आहेत, याबाबत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी माहिती दिली आहे.

 

अशी आहे यादी :

विठ्ठल सहकारी साखर कारखाना, सोलापूर
सिद्धनाथ शुगर लिमिटेड, उत्तर-सोलापूर
लोकमंगल शुगर लिमिटेड, दक्षिण सोलापूर
गोकुळ माऊली शुगर, अक्कलकोट
संत दामाजी कारखाना, मंगळवेढा
भीमा सहकारी साखर कारखाना, मोहोळ, सोलापूर
मकाई सहकारी साखर कारखाना, करमाळा, सोलापूर
लोकमंगल माऊली शुगर, सोलापूर

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters