
Maharashtra Weather
मुंबई : उत्तर भारतात बर्फवृष्टी झाल्याने गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला आहे. अवकाळी पाऊस तसेच गारपीट होत असल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. सध्या देशातील अनेक ठिकाणी थंडीची मोठी लाट आली आहे. यामुळे सर्वदुर दाट धुके पसरले आहे. येत्या दोन दिवसात पूर्व आणि लगतच्या मध्य भारतात पावसाची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे.
देशातील अनेक भागात थंडीचे प्रमाण वाढले आहे. जलत गतीने थंडीचे प्रमाण वाढत आहे. चार ते पाच दिवस उत्तर भारतात खूप दाट धुके पसरणार आहे. आज महाराष्ट्रातील विदर्भात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 16 आणि 17 जानेवारीला उत्तर-पश्चिम हिमालय पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर 18 ते 20 जानेवारी दरम्यान उत्तर पश्चिम भारतातील भागावर याचा परिणाम होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
राज्यातील या भागात पडणार पाऊस
उत्तर भारतात बर्फवृष्टी झाल्याने गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला आहे. हवामान बदलामुळे राज्यांत पावासाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज महाराष्ट्रातील विदर्भात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान बदलामुळे या राज्यांत पावसाची शक्यता
पावसाची शक्यता असलेल्या राज्यांमध्ये ओडिसा, सिक्किम, बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, आणि झारखंड या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच छत्तीसगडमध्ये देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर 14 आणि 15 जानेवारीला म्हणजे आज आणि उद्या अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Share your comments