1. बातम्या

Important News: रब्बी पिकांचे अवकाळीमुळे मोठे नुकसान! शेतकऱ्यांनो नुकसान भरपाई मिळविण्यासाठी त्वरित करा 'हे' काम

यावर्षी अवकाळी (Untimely Rain) मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे, अवकाळी जणू काळ बनून बरसतच आहे. आधीच खरीप हंगाम (Kharip Season) अवकाळी पावसामुळे पूर्णतः बरबाद झाला आहे. आणि आता अवकाळी पाऊस रब्बी हंगामातील पिकांची (Rabi season crops) नासाडी करत आहे. अवकाळी पावसामुळे अनेक भागात रब्बी हंगामातील पिकांची दुबार पेरणी (Double sowing) करावी लागली होती. दुबार पेरणी केल्यानंतर रब्बी हंगामातील पिके आता कुठे बहरत होती, की त्या पिकांना अजून अवकाळी चे ग्रहण लागले. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे (Due To Hail) मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भातील (Vidarbha) रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
crop insurance

शेतकरी बांधव (Farmer) आता झालेल्या नुकसानीची भरपाई (Compensation for loss) मागत आहेत, मात्र नुकसान भरपाई प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना नुकसानीची माहिती संबंधित विमा कंपन्यांना (To insurance companies) देणे अनिवार्य आहे. तसेच नुकसानीची माहिती ही केवळ 72 तासांच्या आतच संबंधित कंपन्यांकडे सुपूर्द करणे गरजेचे आहे नाहीतर नुकसान भरपाई मिळणार नाही. परंतु अनेक शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत या गोष्टीची माहितीच नाही, त्यासाठी आम्ही आज शेतकरी बांधव कशाप्रकारे नुकसान भरपाईची माहिती संबंधित विमा कंपन्यांना देऊ शकतात याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची माहिती ही सहा प्रकारे संबंधित विमा कंपन्यांना देता येणार आहे.

कशी देणार विमा कंपन्यांना नुकसानीची पूर्वसूचना

  • अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे झालेल्या पिकांची नुकसानविषयी माहिती क्रॉप इन्शुरन्स ॲपद्वारे (Crop Insurance App) भरता येणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की क्रॉप इन्शुरन्स ॲप हे केंद्र सरकारचे ॲप्लिकेशन आहे, हे ऍप्लिकेशन आपण प्लेस्टोर (Play Store) या प्लॅटफॉर्मवरून डाऊनलोड करू शकता. अँप्लिकेशन आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड केल्यानंतर ते ॲप्लिकेशन (Application) इन्स्टॉल करा इन्स्टॉल (Install) केल्यानंतर ॲप्लिकेशन मध्ये मागितलेली माहिती व्यवस्थितरीत्या भरणे आवश्यक आहे.
  • काही कारणास्तव क्रॉप इन्शुरन्स ॲप द्वारे जर माहिती भरली जात नसेल तर आपण नुकसान झाल्याची माहिती अथवा पूर्वसूचना 1800 2660 700 या विमा कंपन्यांच्या क्रमांकावर कॉल करून देऊ शकता, मित्रांनो विमा कंपन्यांचा हा टोल फ्री क्रमांक आहे.
  • शेतकरी मित्रांनो आपण नुकसनीची पूर्वसूचना ई-मेल (E-mail) द्वारे देखील विमा कंपन्यांना कळवू शकता. यासाठी pmfby.gov.in या ईमेल आयडी वरती आपणास नुकसान भरपाईची माहिती ई-मेल करून पाठवावी लागेल.
  • शेतकरी मित्रांनो आपण नुकसानीची पूर्वसूचना विमा कंपन्यांच्या तालुकास्तरीय कार्यालयात (In taluka level office) जाऊन देखील देऊ शकता.
  • नुकसानीची पूर्वसूचना कृषी विभागाचे मंडल कृषी अधिकाऱ्यांकडे (To Mandal Agriculture Officer) देखील देता येऊ शकते, यासाठी आपणास मंडळ कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाला भेट द्यावी लागेल.
  • शेतकरी मित्रांनो आपण नुकसानीची पूर्वसूचना ज्या बँकेत (Bank) आपण विमा भरलेला असेल त्या बँकेत देखील देऊ शकता.
English Summary: rabbi crop got damaged by untimely rain farmers should do this work immediately to get compensation Published on: 31 December 2021, 04:48 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters