मान्सूनपूर्व पासूनच बियाणे - खते खरेदी करताना शेतकऱ्यांची बरीच फसवणूक होत आहे. यासाठी कृषी विभागाने सक्त कारवाई देखील केली मात्र अजूनही ही परिस्थिती बदलेली नाही. आता शेतकऱ्यांना थेट रासायनिक खतांसोबत दुय्यम दर्जाचे खत घेण्याची सक्ती केली जात आहे. युरिया खतासोबतच इतर खते आणि औषधांचे लिंकिंग सुरु असून उत्पादक कंपन्यांकडूनच हा कारभार सुरु असल्याचे समोर आले आहे. यावर आता कृषी विभागानेच निर्णय घ्यावा असे खत विक्रेते सांगत आहेत. मात्र या सगळ्यांमध्ये शेतकऱ्यांचीच आर्थिक कोंडी होत आहे.
प्रमुख रासायनिक खतांसोबत दुय्यम दर्जाचे खते शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचे काम चालू आहे. तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस, मिरज, आटपाडी, जत, वाळवा तालुक्यातील शेतकरी रासायनिक खतांची खरेदी करत असून विक्रेत्यांकडूनच युरिया, पोटॅश आणि डीएपी सारख्या रासायनिक खतांसोबत इतर दुय्यम दर्जाची खते घेण्याची शेतकऱ्यांवर सक्ती केली जात आहे. खतांची कमतरता भासू लागेल यामुळे शेतकरी खते खरेदी करण्याची घाई करतआहेत. मात्र दुकानदार याच गोष्टींचा फायदा घेत असल्याचे समोर आले आहे.
यावर प्रतिक्रिया देताना सांगलीचे कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना जे रासायनिक खत हवी आहेत तेच दिले पाहिजे. इतर कोणत्याही खताची सक्ती करता येणार नाही. कंपन्या जर विक्रेत्यांना सक्ती करत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. आणि असं काही आढळ्यास शेतकऱ्यांनी आमच्याकडे तक्रारी कराव्यात. असंही ते म्हणाले.
पिक उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून रासायनिक खते खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. पिकांना योग्य वेळी खत दिले गेले नाही तर त्याचा उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो. शेतकरी खरीप पेरणीसाठी युरिया, डीएपी,१९:१९:१९ ही रासायनिक खते खरेदी करत आहेत. मात्र शेतकरी २६० रुपयांच्या युरियाच्या पोत्यावर २०० रुपयांचे इतर रासायनिक खतेही खरेदी करत आहेत. शेतकऱ्यांवर २०० रुपयांचे मायक्रोन्यूट्रेट खरेदीची सक्ती केली जात आहे.
'स्वाभिमानी मिळवून देणार शेतकऱ्यांना ५० हजार, पूर असेल तर पोहत येऊन मोर्चात सहभागी व्हा'
शेतकरी आपली पिके जोमात यावी यासाठी इतर रासायनिक खतांचीही खरेदी करत आहेत. काही खत विक्रेत्यांनी तर कृषी संजीवके तयार केली आहेत यांच्यावर कडक कारवाईची गरज असल्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महेश खराडे यांनी केली आहे. तसेच या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
काय सांगता! लग्नानंतर रोज साडीच नेसावी लागणार, नवरीकडून त्याने कॉन्ट्रॅक्टवर सहीच घेतली
Insect Management: करा हा उपाय,गायब होतील सोयाबीनवरच्या गोगलगाय,होईल सोयाबीनचा बचाव
Share your comments