कर्जवाटपासाठी जिल्हा बँकांना ५०० कोटींचा निधी

09 May 2020 04:04 PM


कोरोना व्हायसरमुळे देशातील उद्योगधंद्यांवर पक्षाघात आला आहे. शेती व्यवसायही त्यातून सुटलेला नाही. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आला असून यात शेतकऱी वर्गाला आर्थिक अडचण सहन करावी लागत आहे. आता खरीप हंगाम येत असल्याने शेतकऱ्यांना पुढील उत्पन्नाची चिंता सतावत आहे. दरम्यान  रिझर्व्ह बँकेने खरिपासाठी नाबार्डला २५ हजार कोटी रुपये दिले आहेत. त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला ५०० कोटी रुपये आले आहेत.

दरम्यान खरीपाकरीता वेळेत कर्ज मिळाविण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकांना तातडीने ५०० कोटीचे कर्ज निधी देण्याचा निर्णय शिखर बँकेने घेतला आहे. जिल्हा बँकांनी गेल्या खरीपात शिखरक बँकेकडून सहा हजार कोटीचे कर्ज घेतले होते. यंदा देखील आम्ही भरपूर तरतुद केली आहे. बँकांचे प्रस्ताव येताच कर्ज वाटप केले जाईल. त्यासाठी आम्ही नाबार्डकडून धोरणानुसार पहिल्या टप्प्यातील ५०० कोटीचा निधी आम्ही जिल्हा बँकांकडे दोन दिवसाता वर्ग करणार आहोत, अशी माहिती शिखर बँकेच्या सुत्रांनी दिली.  लॉकडाऊनमुळे कृषी पत पुरवठा व्यवस्थेला फटका बसला आहे. यामुळे कृषी पत पुरवठ्याला आधार देण्याची घोषणा

ठी रिझर्व्ह बँकेने काही दिवसांपुर्वी केली होती. त्यानुसार सहकारी  व ग्रामीण बँका तसेच सुक्ष्म आर्थिक पुरवठा संस्थांना २५ हजार कोटी रुपये देण्यात आले आहे.  नाबार्डच्या देशभरातील सर्व शाखांमध्ये गेल्या काही दिवसांपासून लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांना खरीप कर्जवाटप सुलभ होण्यासाठी  देशातील विविध सहकारी बँकांना पुनर्वित्त निधी वाटण्यासाठी ही लगबग सुरू आहे. हा कर्ज निधी ४.८ टक्के व्याजदराने बँकांना मिळणार आहे.

RBI NABARD crop loan farmer corona virus lockdown kharif district bank कोरोना व्हायस लॉकडाऊन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नाबार्ड कर्जवाटपासाठी जिल्हा बँकांना ५०० कोटींचा निधी
English Summary: five crore rs fund to district banks for disbursed loan

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.