1. बातम्या

MSME सेक्टर मार्फत निर्माण होणार ५ कोटी नोकऱ्या


देशात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले, परंतु या लॉकडाऊनच्या काळात देसाची अर्थव्यवस्था पुर्णपणे कोलमडली. पण कृषी क्षेत्रामुळे  अर्थव्यवस्था रुळावर येत आहे. तर दुसरीकडे  रोजगार देणारे  MSME सेक्टर पासून मोठी आशा देशाला आहे. यातून ५ कोटी नोकऱ्या तयार होतील, असा दावा रस्ते, वाहतूक, जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात केला आहे. स्वावलंबन ई-समिट २०२० च्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

आपल्या देशाच्या विकासासाठी MSME सेक्टरचं मोठं योगदान आहे. जीडीपीमध्ये  ३० उत्पन्न हे MSME सेक्टरमधून येते. देशातून निर्यात होणाऱ्या वस्तूंमधून  ४८ टक्के निर्यात ही MSME सेक्टर मधून होते.  पुढील पाच वर्षात  ग्रोथ रेट ५० टक्के, तर निर्यात  ४८ टक्क्यांवरुन ६० टक्के करणे आणि नव्या ५ कोटी नोकऱ्या तयार होतील असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

एमएसएमईचा लाभ मिळविण्यासाठी नोंदणी नसलेल्या उद्योगांना सूक्ष्म उद्योगांतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे.  छोटे व्यापाऱ्यांचाही यात समावेश व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. अशा व्यापाऱ्यांनी नोंदणी करावी यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करत असल्याचेही त्यांनी सांगितले.  असंघटित व्यापाऱ्यांना यात समविष्ट करण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

दरम्यान कोरोना सारख्या संकटात देण्यात आलेले २० लाख कोटी रुपयांचे राहत पॅकेजमधून  एमएसएमई सेक्टरला सर्वाधिक लाभ मिळाला आहे. या पॅकेजच्या माध्यमातून  ३ लाख कोटी रुपयांचे कर्जाची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे ४५ लाख एमएसएमईला लाभ होणार आहे. दरम्यान अर्थमंत्र्यांच्या मते,  १२ कोटीपेक्षा अधिक लोकांना रोजगार एमएसएमईमार्फत मिळतो.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters