आजपासून विधानसभेसह विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरवात झाली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विधानसभेत राष्ट्रपतींसह उपराष्ट्रपतींच्या अभिनंदन प्रस्तावावर भाषणे झाली. विधान परिषदेत मात्र याआधी कधीही न पाहायला मिळालेले ऐतिहासिक चित्र दिसून आले. मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे देखील शिवसेनेचे आहेत. तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असलेले अंबादास दानवे हे देखील शिवसेनेचे आहेत.
यामुळे हे अधिवेशन इतर अधिवेशनापेक्षा काहीसे वेगळे आहे. सध्याच्या राजकीय पेचामुळे एकाच पक्षातील दोन नेते एकमेकांसमोर उभे असल्याचे चित्र दिसून आले. असे असताना विरोधकांनी पायऱ्यांवरच घोषणाबाजी केली आहे. ५० खोके एकदम ओके. आले रे आले गद्दार आले, अशा घोषणा यावेळी विरोधकांनी दिल्याचे पाहायला मिळाले. यामुळे याची चर्चा सुरु आहे.
यावेळी शिवसेना राष्ट्रवादीसह काँग्रेसचे आमदार एकसाथ थांबून घोषणा देत असल्याचे दिसून आले. शिंदे फडणवीस सरकारचे हे पहिलेच अधिवेशन असल्यामुळे या अधिवेशनात नवीन सरकार काय महत्वाचे निर्णय घेणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष आहे. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यसह इतर आमदार त्यासोबतच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह इतर आमदार घोषणा देताना दिसून आले.
फक्त हर घर तिरंगा म्हणायचं का? रात्र झाली तरी तहसील कार्यलयावरील राष्ट्रध्वज तसाच, राज्यात खळबळ..
दरम्यान, काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत काही निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये ७५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना एसटीमध्ये मोफत प्रवास करण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांना मदतीची देखील घोषणा करण्यात आली आहे. आता आज काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
काय ते कार्यकर्त्यांवरच प्रेम!! उदयनराजेंचा नादच खुळा, कार्यकर्त्याला तोंडाने भरवला पेढा..
आता होणार राडा! रॉयल एनफिल्ड इलेक्ट्रिक बाईक मार्केटमध्ये येणार..
अमूल, मदर डेअरीने दुधाच्या दरात लिटरमागे २ रुपयांची केली वाढ..
Share your comments