1. बातम्या

खतांची टंचाई ठरलेलीचं! गेल्या खरीपात निसर्गाच्या लहरीपणामुळे तर येत्या खरीपात खतांमुळे उत्पादनातील घट अटळ

गेल्या अनेक वर्षांपासून बळीराजा नैसर्गिक संकटांमुळे हतबल झाला आहे तर मोठ्या कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे मेटाकुटीला आला आहे. सुलतानी आणि अस्मानी संकटामुळे भरडला जाणारा बळीराजा येत्या खरीप हंगामात देखील एका वेगळ्या कारणामुळे भरडला जाऊ शकतो असं चित्र बघायला मिळत आहे. गेल्या खरिपात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले, या खरीपातील नुकसानीची भरपाई करण्यासाठी शेतकरी राजा मोठ्या आशेने रब्बी हंगामातकडे वळला होता. मात्र हंगामाच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाने हजेरी लावून रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसवला पण शेतकरी राजाने त्या विपरीत परिस्थितीवर योग्य नियोजनाने मात केली.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
fertilizer

fertilizer

गेल्या अनेक वर्षांपासून बळीराजा नैसर्गिक संकटांमुळे हतबल झाला आहे तर मोठ्या कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे मेटाकुटीला आला आहे. सुलतानी आणि अस्मानी संकटामुळे भरडला जाणारा बळीराजा येत्या खरीप हंगामात देखील एका वेगळ्या कारणामुळे भरडला जाऊ शकतो असं चित्र बघायला मिळत आहे. गेल्या खरिपात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले, या खरीपातील नुकसानीची भरपाई करण्यासाठी शेतकरी राजा मोठ्या आशेने रब्बी हंगामातकडे वळला होता. मात्र हंगामाच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाने हजेरी लावून रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसवला पण शेतकरी राजाने त्या विपरीत परिस्थितीवर योग्य नियोजनाने मात केली.

यामुळे शेतकरी राजांना रब्बी हंगामातुन दर्जेदार उत्पादनाची आशा होती मात्र आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना महावितरण कडून सक्तीची वीजबिल वसुली केली जात असून शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा देखील खंडित केला जात आहे, या सर्व विपरीत परिस्थितीमुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसत आहे आणि शेतकरी बांधवांना उत्पादनात घट होण्याची भीती चिंताग्रस्त बनवत आहे. अशा सुलतानी आणि आसमानी संकटातून भरडला जाणारा बळीराजा येत्या खरिपात देखील भरडला जाऊ शकतो. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे, रशिया आणि युक्रेनमध्ये घमासान युद्ध सुरू आहे आणि आपल्या देशात सर्वात जास्त रशिया मधून खतांची आयात केली जाते या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशिया मधून खतांच्या आयातीवर एक मोठा प्रश्न चिन्ह उभे झाले आहे. सध्या यामुळे देशात मोठ्या प्रमाणात खतांच्या किमती वाढल्या आहेत, तसेच जर आता खतांची आयात केली गेली नाही तर आगामी खरिपात खतांची पूर्तता करणे अशक्य होऊन बसेल. या एकंदरीत परिस्थितीचा विचार करता केंद्र सरकारला आता खत आयातीबाबत दुसऱ्या पर्यायांचा विचार करावा लागणार आहे. खरिपात खतांची पूर्तता झाली नाही तर उत्पादनात कधी न भरून निघणारी घट होऊ शकते असा तज्ञांचा अंदाज आहे.

आपल्या देशात जवळपास खताची निर्मिती होतच नाही असे म्हणले तरी काही हरकत नाही, कारण की देशात खूपच  नगण्य प्रमाणात खत तयार केले जातात. एवढेच नाही खत तयार करण्यासाठी आवश्यक असणारा कच्चामाल देखील आपल्याला आयात करावा लागतो. मध्यंतरी खतांसाठी आवश्यक असणारा कच्चामाल उपलब्ध होत नव्हत्या त्यामुळे देशात सर्वत्र खतांच्या किमती मोठ्या वाढल्या होत्या. देशात खूपच नगण्य खतांची निर्मिती होत असल्याने मोठ्या प्रमाणात खतांची आयात करावी लागते, या एकूण आयातीपैकी रशिया बेलारुस आणि युक्रेन या तीन देशातून सुमारे 20 टक्के खत आयात केली जातात. म्हणजेच सध्या युद्ध सुरू असलेल्या देशातूनच 20 टक्के खतांची आयात आहे त्यामुळे याचा परिणाम खरिपात जाणवू शकतो. साधारणपणे भारत एका वर्षासाठी 70 लाख टन डीएपी आणि 50 लाख टन पोट्याश परदेशातून मागवत असतो. एकंदरीत युद्धामुळे खतांची आयात प्रक्रिया मोठी प्रभावित होणार असून खरिपात खतांचा तुटवडा जाणवू शकतो. कृषी क्षेत्रातील जाणकार लोक असे सांगत आहेत की, केंद्र सरकारने दुसरा मार्ग अवलंबत खतांची उपलब्धता जरी केली तरी खतांचा दर हा वाढणार ही 'काळ्या दगडावरची पांढरी रेष' आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, आपल्या देशात मात्र खरिपात लागणाऱ्या खतांपैकी 30% खताचा साठा उपलब्ध आहे. आणि खरीप हंगाम अडीच महिन्यात सुरू होणार आहे असे असले तरी शेतकरी बांधव खरीप हंगाम सुरू होण्याआधी पंधरा दिवसापासूनच खतांची खरेदी सुरू करत असतात. त्यामुळे खत नियोजनासाठी केंद्र सरकारकडे मात्र दोन महीने शेष राहिले आहेत. पिकांसाठी आवश्यक विद्राव्य, संयुक्त आणि पोट्याशयुक्त खते युद्ध सुरू असलेल्या रशिया युक्रेन आणि रशियाला पाठिंबा असलेल्या बेलारूस मधून आयात होत असतात त्यामुळे या युद्धाचा विपरीत परिणाम भारतातील शेतकऱ्यांना सोसावा लागू शकतो. एव्हाना केंद्र सरकारला खत नियोजन करण्यासाठी आत्तापासूनच कंबर कसावी लागणार आहे. एकंदरीत खरीप हंगामात खत टंचाई व खतांच्या वाढत्या किमती यामुळे बळीराजा भरडला जाणार हे अटळ.

English Summary: fertilizer shortage in kharip is fixed as of this war government should try other ways otherwise Published on: 07 March 2022, 09:52 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters