1. बातम्या

अनियमित मान्सूनमुळे देशातील खत विक्री १२ टक्यांनी घटली

मान्सून ने मारलेल्या दांडीने देशाच्या अनेक भागांमध्ये अजूनही पुरेसा पाऊस पडलेला नाही त्यामुळे एप्रिल ते जुलै या महिन्या दरम्यान जी शेतीसाठी लागणारी रासायनिक खते आहेत त्यांची विक्री मागील वर्षी झालेल्या तुलनेत १२.४ टक्याने घटलेली आहे

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Fertilizer

Fertilizer

मान्सून ने मारलेल्या दांडीने देशाच्या अनेक भागांमध्ये अजूनही पुरेसा पाऊस पडलेला नाही त्यामुळे एप्रिल ते जुलै या महिन्या दरम्यान जी शेतीसाठी लागणारी रासायनिक खते आहेत त्यांची विक्री मागील वर्षी झालेल्या तुलनेत १२.४ टक्याने घटलेली आहे

सूत्रांच्या माहिती नुसार युरिया ची विक्री १२.८ टक्यांनी घसरलेली आहे तसेच डाय - अमोनियम फॉस्फेट ची विक्री २७.५ टक्यांनी घसरलेली आहे. म्युरेट ऑफ पोटॅशची विक्री ८.८ टक्यांनी घसरलेली आहे तर मिश्र खतांची विक्री पाहायला गेले तर त्याची विक्री ६.५ टक्यांनी घसरलेली आहे. यावर्षी  पाहायला गेले  तर फक्त सिंगल सुपर फॉस्फेट ची विक्री चालू वर्षामध्ये ४.६  टक्यांनी वाढलेली  आहे. खतांच्या विक्रीमध्ये यावर्षी  जर घसरण पहिला  गेले तर कृषी  मंत्रालयाच्या पेरणीची आकडेवारी पहिली तर त्या तुलनेशी जुळत आहे. कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ३० जून पर्यंत खरीप हंगामातील पेरण्या गेल्या वर्षीच्या तुलनेत ४.७ टक्यांनी घट झालेली आहे.भात पिकाचे क्षेत्रामध्ये ४ टक्यांनी घसरण झालेली आहे तसेच डाळिंब पिकाचे क्षेत्र ३ टक्यांनी कमी झालेले आहे. अन्न धान्य क्षेत्र पाहायला गेले तर त्यामध्ये ५.७ टक्यांनी घट झालेली आहे तसेच तेलबिया च्या खालील क्षेत्र ५.५ टक्यांनी कमी झालेले आहे तर कापूस पिकाचे क्षेत्र ८.७ टक्यांनी घसरलेले आहे.

हेही वाचा:उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ग्राम कृषी संजीवनी समित्याबद्दल घेतले हे निर्णय

लॉकडाऊनमुळे घाबरून गेलेल्या शेतकऱ्यांनी आधीच शेतीसाठी लागणारी खते विकत घेऊन ठेवल्यामुळे यावेळीच्या आकडेवारी ची तुलना गेलेल्या  वर्षीच्या आकडेवारिशी जुळणार नसल्याचे फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडियाचे महासंचालक सतीश चंदर यांनी सांगितलेले आहे.प्रत्येक वर्षी सरकार साधारणपणे शेतकऱ्यांना किती प्रमाणात खते लागतोल याचा अंदाज घेत त्या प्रमाणे खताचा साठा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सरकार करत असते पण यावर्षी अचानक पावसामुळे फटका बसून खतांची विक्री वर परिणाम दिसत आहे जे की यावेळी असाच एक प्रकार आपल्याला समोर येत दिसल्याचे आहे.

जुलैमध्ये कमी झाले पावसाचे प्रमाण:-

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी खतांची विक्री तसेच पेरण्या मध्ये झालेल्या घसरणीमध्ये झालेला परिणाम तो फक्त मान्सूनच्या अनियमितमुळे झालेला आहे. जून महिन्यामध्ये सरासरी पाऊसापेक्षा ९.६ टक्यांनी जास्त पाऊस झाला असून सुद्धा जुलै महिन्यात सरासरी अंदाजापेक्षा ६.७ टक्यांनी कमी पाऊस झालेला आहे. ११ ते २० जुलै दरम्यान मोठ्या प्रमाणात कोरडा भाग पडला जे की या दरम्यान कसलाच पाऊस पडला नाही. या कालावधीमध्ये खरीप पेरण्याचा हंगाम लागलेला असतो. १२ जुलै नंतर थोड्या प्रमाणात पाऊस झाला मात्र या महिन्यात जी खत विक्री होते ती मागील वर्षाच्या तुलनेमध्ये १६.६ टक्यांनी कमी झालेली आहे.

English Summary: Fertilizer sales in the country declined by 12 percent due to erratic monsoon Published on: 03 August 2021, 08:41 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters