यंदा पाऊस काहीसा उशिरा सुरू झाला असे असताना मात्र पावसाने सध्या राज्यात सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. यामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. असे असताना आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचे असलेले उजनी धरण सध्या शंभर टक्क्यांवर गेले आहे. धरणात सध्या ११८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. यामुळे दिलासा मिळाला आहे. सध्या धरणाच्या १६ दरवाज्यातून एकूण ३१ हजार ६०० क्युसेकने भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे.
तसेच पुणे, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महत्वाचे असलेले वीर धरणातून ४२ हजार ९३३ क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. यामुळे भीमा नदीत ७३ हजार क्युसेक विसर्ग सुरु आहे. सध्या धरण क्षेत्रात आणि नदी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
एकाच पिकात चार पिके, नवीन तंत्रज्ञानामुळे मिळणार बक्कळ पैसा..
भीमा नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढल्याने पूर परिस्थित उद्भवू नये, यासाठी प्रशासनाकडून योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे. येणाऱ्या काही दिवसात पाऊस अजूनही सुरूच राहणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
आकडा टाकणारांनो सावधान! महावितरण ठेवणार करडी नजर, 131 कोटींच्या विजचोऱ्या उघडकीस
आजच निवडणूका झाल्या तर काय? राज्यात भाजपचे होणार पानिपत, धक्कादायक सर्व्हे आला समोर..
काय तो पैसा, काय ते अधिकारी, एकदम ओकेच!! आयकरच्या छाप्यात इतका पैसा की रक्कम मोजायला लागले तब्बल १४ तास..
Share your comments