निसर्गाच्या लहिरीप्रमाणे सोयाबीनचे भाव बदलत असतात. आवक कमी जास्त झाली की, दर कमी जास्त होत असतात. गेल्या आठ दिवसांपासून सोयाबीनच्या वाढत्या दराचीच चर्चा सुरु आहे. आज (गुरुवारी) देखील (Soybean Rate) सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे. सोयाबीनला उच्चांकी भाव मिळत आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये तब्बल 1 हजार रुपयांनी सोयाबीनचे दर वाढलेआहेत. यामुळे शेतकरी सुखावला आहे.
सध्या सोयाबीनचा बाजार हा तेजीत आहे. सध्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चांदी झाली आहे. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक दर गुरुवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Latur Market) मिळाला आहे. बुधवारी 7 हजार तर अवघ्या 24 तासांमध्ये 7 हजार 300 रुपये प्रति क्विंटल सोयाबीनचे दर झाले आहेत.
आजून दर वाढण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून सोयाबीन दरात वाढ होत आहे. शिवाय 18 ते 20 हजार पोत्यांची आवक ही थेट 30 हजार पोत्यांवर गेली आहे. असे असूनही भविष्यात दर वाढतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या दरात विक्री की साठणूकीचाच शेतकरी निर्णय घेणार हे पहावे लागणार आहे. परदेशात सोयाबीनचे उत्पादन घटल्याने दर वाढ होत आहे आणि भविष्यातही होईल असा अंदाज व्यापारी व्यक्त करता आहेत.
हेही वाचा : शेतकऱ्यांनो पारंपरिक शेती सोडा आणि करा जेरेनियमची लागवड; डोळे झाकून कमवा ५ लाख
अफगाणिस्तानने कितीपण कुरघोड्या केल्या तरी, भारताने जपला माणूसकीचा धर्म, अन्यधान्यांची केली मोठी मदत
Share your comments