Kharif Season :हंगामापूर्वी कपाशीची लागवड केल्याने बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं निदर्शनास आले होते. त्यामुळे या बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी एक जून पूर्वी कापूस उत्पादक शेतकर्यांना कापसाच्या बियाणांची विक्री करू नये, असे राज्य सरकारने परिपत्रक काढले होते. कृषी विभागाच्या निर्णयाची कृषी सेवा केंद्राकडून अंमलबजावणी केली जात आहे.
दरम्यान नियमांचे उल्लंघन करुन कापूस बियाणांची विक्री करणे तसेच बियाणे कंपनीने कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे कृषी विभागाने कारवाई देखील केली होती. त्यासाठी ९ पथके तैनात करण्यात आली होती. मात्र आता आजपासून कृषी सेवा केंद्रांना विक्री तसेच राज्यभरातील शेतकरी बंधूना कापूस बियाणे खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकऱ्यांनी हंगामपूर्व कामे उरकली असून आता शेतकऱ्यांची कपाशी पेरणीसाठी लगबग सुरु होईल.
गेल्या दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्यामुळे खरिपासाठी सर्वकाही पोषक असणारं वातावरण तयार झालं आहे. मराठवाडा विभागात कपाशीचे क्षेत्र घटले आहे. तर दुसरीकडे विदर्भात कपाशीचे लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे. हंगामापूर्वीच जर कपाशीची लागवड केली तर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे कृषी विभागाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे राज्य सरकारने हंगामापूर्वी बियाणे न विकण्याचे परिपत्रक काढले.
मोठी बातमी!! भारतामध्ये लवकरच येणार लोकसंख्या नियंत्रण कायदा, मोदी सरकार घेणार मोठा निर्णय
बोंडअळीच्या प्रादुर्भामुळे पिकांच्या बरोबर जमिनीचेही बरेच नुकसान होत आहे. दरम्यान, हंगाम सुरु होण्यापूर्वीच खताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो अशी अफवा पसरवली जात होती तसेच तुटवडा निर्माण झाल्यास खतांच्या किमतीमध्ये वाढ होऊ शकेल असे चित्र निर्माण केले जात होते. या प्रक्रियेवर निर्बंध घालण्यासाठी भरारी पथक तैनात केले होते. नियमांचे उल्लंघन केलेल्या काही कृषी विभागावर कृषी सेवा केंद्रांनी कारवाई देखील केली आहे.
विक्रेत्यांनी केला होता विरोध
हंगामापूर्वी बियाणे विकण्यास व खरेदीवर बंदी घातल्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होणार असल्याचे कारण पुढे करीत विक्रेत्यांनी या निर्णयाला विरोध केला होता. मात्र तरीही बंदी हटवण्यात आली नाही. आता पोषक वातावरणामुळे योग्य वेळी कपाशीची पेरणी होईल असा विश्वास कृषी विभागाने दर्शवला आहे.
महत्वाच्या बातम्या
मोदी सरकारचा पुन्हा एकदा सर्वसामान्यांना दिलासा; गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात, वाचा नवे दर
'बैल कधी एकटा येत नाही, सोबत नांगर घेऊन येतो'
Share your comments