गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. असे असताना आता उस्मानाबादच्या (Osmanabad) तब्बल साडेतीन लाख शेतकऱ्यांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. खरीप 2020 साली अतिवृष्टीने उस्मानाबाद जिल्ह्यात मोठे नुकसान झाले होते. मात्र शेतकऱ्यांना पीकविमा कंपन्यांकडून मदत मिळाली नाही.
यामुळे शेतकरी आक्रमक झाले होते. याविरोधात शेतकऱ्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. औरंगाबाद खंडपीठानंही शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला होता. त्या निकालाविरोधात विमा कंपनी सुप्रीम कोर्टात गेली होती. सुप्रीम कोर्टाच्या निकालानं आज निर्णय देत शेतकऱ्यांना तीन आठवड्याच्या आत विम्याचे पैसे देण्याचे आदेश दिले आहेत.
यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निकालानंतर शेतकऱ्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला आहे. हे पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडून जोरदार प्रयत्न केले जात होते. खरीप 2020 साली अतिवृष्टीने उस्मानाबाद जिल्ह्यात मोठे नुकसान झाले होते. आता भरपाई मिळणार असल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांनी जगायचे कसे? उडीद, तुरीचे मोठे नुकसान, रोहित पवारांची मदतीची मागणी
दरम्यान, आता सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. धाराशिव शहरातील शिवाजी चौकामध्ये शेतकऱ्यांनी मिठाई वाटून एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त केला आहे. सध्या पावसाळा सुरु असल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी पैशांची गरज आहे. यामुळे आता हे पैसे त्यांच्या कामी येणार आहेत.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर राणे कुटुंबाच्या कारला अपघात, ट्रकने दिली धडक
हा निर्णय लागताच शेतकऱ्यांकडून आतिषबाजी करण्यात आली. या शेतकऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे व सरकारचे आभार मानले. येणाऱ्या काही दिवसांमध्ये आता हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत.
महत्वाच्या बातम्या;
'अहमदशाह, आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा आता अमित शाह'
दिल्लीचा ऐतिहासिक राजपथ आता होणार 'कर्तव्यपथ', मोदी सरकार नाव बदलणार..
बारामती मिशनला सुरुवात! कन्हेरी मंदिरात नारळ, पवार ५५ वर्ष हरले नाहीत, त्याच मंदिरात बावनकुळे जाणार
Share your comments