यंदा उकाडा हवामानाचा सर्वाधिक वाईट परिणाम शेतकऱ्यांवर झाला आहे. एकीकडे पावसाअभावी अनेक शेतकरी खरीप पिकांच्या पेरणीची कामे करू शकले नाहीत. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे भात, कापूस, बाजरी यासह अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. असे असताना माहितीअभावी बहुतांश शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळत नाही.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आता पीक नुकसानीचे ऑनलाइन अहवाल शासनाला पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. हरियाणा सरकारने याबाबत पहिला प्रयोग केला असून लवकरच इतर राज्यातील लोकांसाठी देखील हा पर्याय उपलब्ध होणार आहे. 'मेरी फसल मेरा ब्योरा' या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करून शेतकरी आता स्वत: त्यांच्या पिकांच्या नासाडीची माहिती सरकारपर्यंत पोहोचवू शकतील.
यामध्ये पिकाचे ७५ टक्के किंवा त्याहून अधिक नुकसान झाल्यास शेतकऱ्याला १५ हजार रुपयांपर्यंतची भरपाईही दिली जाईल. हरियाणा राज्यातील शेतकरी त्यांच्या पिकांच्या नुकसानीचे ऑनलाइन अहवाल पाठवण्यासाठी, सर्वप्रथम मेरी फसल मेरा ब्योरा (हरियाणा) (haryana.gov.in) या अधिकृत पोर्टलवर ही सेवा उपलब्ध केली आहे.
बातमी कामाची! शेतकऱ्यांनो बोगस खते कशी ओळखायची? वाचा साधी सोप्पी पद्धत
अशाप्रकारे ही सेवा सुरु करणारे पहिलेच राज्य आहे. अनेकदा शेतात पंचनामे करायला कोणी येत नाही. यामुळे अनेकदा अडचणी निर्माण होतात. यामुळे शेतकरी मदतीपासून वंचीत राहतात. मात्र आता या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तसेच या यंत्रणेवरचा ताण देखील कमी होणार आहे.
भाजप नेत्याला मोठा धक्का! 28 वर्षांनंतर साखर कारखान्याची सत्ता राष्ट्रवादीकडे
दरम्यान, राज्यात मोठ्या प्रमाणावर पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. असे असताना अनेक ठिकाणी नुकसान झाले नाही, म्हणून शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत. काही ठिकाणी तर शेतकरी संपावर गेले आहेत, अशा प्रकारे अनेक शेतकरी मदतीपासून वंचीत राहत आहेत.
महत्वाच्या बातम्या;
लसीकरण झालेल्या बैलांना शर्यतीस परवानगी मिळणार? बैलगाडा चालकांची मागणी
२४५० रुपये FRP बसत असताना २५०० रुपये भाव देण्याचे जाहिर केल्यानुसार कारखाना लवकरच उर्वरित दर देणार
ब्रेकिंग! ऊस दर आंदोलन पेटले, शेतकरी संघटनेने थांबवली वाहतूक
Share your comments