शहरीकरणामुळे जमिनींचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत स्थावर मिळकतीमध्ये जमिनीला महत्त्व आहे. जमीन खरेदी विक्रीमध्ये होत असलेली वाढ, नवीन प्रकल्प, विकास आराखडे, प्लॉटींग, हिस्सेवारी इत्यादी कारणांमुळे जमीन मोजणीला खूप महत्त्व आले आहे. पूर्वीच्या काळी राजेशाही, संस्थाने यांच्या हद्दी कशा ठरत असत, जमीन कशी मोजली जात होती. हद्दीचे वाद कले सोडवले जात होते.
दिवसेंदिवस इंच इंच जागेला किंमत आल्याने मोजणीमध्ये गती व अचूकता यावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ लागला आहे. डिजिटल थिओडोलाईट नंतर टोटल स्टेशन या उपकरणाचा सध्या जमीन मोजणीसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. टोटल स्टेशन मध्ये इनबिल्ट डिजिटल थिओडोलाईट EDM (Electronic Distance Meter) असल्याने अचूक मोजणी शक्य होते.
महाराष्ट्र शासनाच्या भूमिअभिलेख खात्याने देखील नवीन तंत्राचा वापर मोजणीसाठी सुरू केलेला आहे. मोजणी क्षेत्रात नव्याने GNSS (Global Navigation Satelite System) प्रणालीचा वापर होत आहे. यामध्ये उपग्रहाद्वारे जमिनीचे अक्षांश व रेखांश मिळविले जातात आणि संगणक प्रणालीद्वारे नकाशांचे आरेखन केले जाते.
शेतकऱ्यांनो दुधाळ जनावरांसाठी अधुनिक आहार पद्धती जाणून घ्या, होईल फायदा..
राज्यात सर्व्हे ऑफ इंडियाच्या सहकार्याने ७७ ठिकाणी कॉर्स (Contineous Operation Reference Station) उभारले आहेत. या कॉर्सच्या आधारे जीपीएस रीडींग ३० सेकंदात घेता येतात. त्यामुळे जमिनीची मोजणी ३० ते ३५ मिनिटांत करता येणे शक्य झाले आहे.
मिळकतधारकांना त्यांच्या मिळकतीचे नकाशे, मालमत्तापत्रक लवकर मिळावेत. नवीन मालमत्तांचा शोध यासाठी ड्रोन सर्वेक्षण ही सुरू करण्यात आले आहे. परंतु, त्यासाठी संबंधित खात्यांच्या पूर्वपरवानग्या आवश्यक असतात.
पिवळ्या कलिंगडाला मोठी मागणी! शेतकरी होतोय मालामाल...
मोजणी केल्यानंतर जमीन मालकांना मोजणीच्या नकाशांची "क प्रत" भूमिअभिलेख विभागाकडून देण्यात येते. सध्या गाव नकाशे, गट नकाशे, डी. पी. नकाशे संदर्भासाठी वापरले जातात. राज्याच्या पुनर्मोजणीचा प्रकल्प देखील शासनाने हाती घेतला आहे.
स्वामित्व योजना सर्व्हे ऑफ इंडिया सहकार्याने सुरू आहे. लहान लहान होत चाललेले जमिनीचे तुकडे, नवीन पायाभूत सुविधा, निवासी प्रकल्प, विकास आराखडे, रस्ते बांधणी यामुळे येणारा काळ हा जमीन मोजणी क्षेत्रासाठी अधिक आव्हानात्मक असणार आहे.
शेतकऱ्यांनो शेतीच्या अवजारांची अशा प्रकारे राख निगा आणि देखभाल..
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात मृत्यूचा आकडा 11 वर, उन्हात कार्यक्रम घेतल्याने होतेय टीका
शेतकरी मुलांच्या लग्नासाठी आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, मुलीला 10 लाख देण्याची मागणी...
Share your comments