1. पशुधन

शेतकऱ्यांनो दुधाळ जनावरांसाठी अधुनिक आहार पद्धती जाणून घ्या, होईल फायदा..

सध्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. उच्च दूध देणाऱ्या गाई व म्हशींच्या आहार व्यवस्थापनात (Animal Diet Management) युरिया मोलासेस मिनरल ब्लॉक (Mineral Block), एक्सोजेनस एन्झाइम आणि चयापचय आणि किण्वन सुधारकाचा वापर फायद्याचा ठरतो.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
modern feeding methods for milch animals

modern feeding methods for milch animals

सध्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. उच्च दूध देणाऱ्या गाई व म्हशींच्या आहार व्यवस्थापनात (Animal Diet Management) युरिया मोलासेस मिनरल ब्लॉक (Mineral Block), एक्सोजेनस एन्झाइम आणि चयापचय आणि किण्वन सुधारकाचा वापर फायद्याचा ठरतो.

यामध्ये एक्सोजेनस एन्झाइम्सचा वापर पिकांच्या अवशेषांच्या चांगल्या वापरासाठी आहे. हे एन्झाइम्स प्रामुख्याने सेल्युलोज, हेमिसेल्युलोज किंवा बुरशीजन्य असतात. एन्झाइम पावडर, दाणेदार किंवा द्रव स्वरूपात असू शकतात. ते खाण्याआधी चाऱ्यावर फवारणी केल्यास प्रभावीपणे काम करतात.

एन्झाइम्स आहारात मिसळल्यामुळे रुमेनची हायड्रोलाइटिक क्षमता वाढते. वाढीसाठी आवश्यक असलेल्या सूक्ष्मजीवांची संख्या वाढते. तसेच पोषक तत्त्वांचा वापर, खाद्य कार्यक्षमता, वाढीचा दर, दुधाचे उत्पन्न आणि त्याची रासायनिक संरचना सुधारण्यासाठी जनावरांना खायला दिले जाते, इंजेक्शन दिले जाते. किण्वन सुधारक खाद्यामध्ये रुमेन किण्वन हाताळण्यासाठी वापरली जातात.

भारतीय शेतीमध्ये सौर उर्जेवर चालणाऱ्या ट्रॅक्टरचे फायदे

रवंथ करणाऱ्या जनावरांच्या रुमेनमध्ये मोठ्या प्रमाणात फायदेशीर सूक्ष्मजीव असतात, जे खाद्याच्या तंतुमय घटकांचे पचन करण्यास मदत करतात. हिरव्या चाऱ्याच्या टंचाईच्या काळात, युरिया मोलासेस मिनरल ब्लॉक जनावरांच्या पोटाच्या रुमेन च्या भागातील सूक्ष्मजंतूंची वाढ होण्यास मदत करते.

धक्कादायक! बैलगाडा शर्यतीसाठी गेलेल्या युवकाच्या पोटात बैलाने खुपसले शिंग, तरुणाचा जागीच मृत्यू..

तसेच युरियाचे कमी प्रमाणात सेवन केल्याने अधिक प्रमाणात जैव-प्रथिने तयार होतात, त्यामुळे जनावराची पचनक्रिया सुधारते. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ने (एनडीडीबी) युरिया मोलॅसेस मिनरल ब्लॉक तयार करण्याची ‘कोल्ड प्रोसेस’ विकसित केली आहे. 

शेतकऱ्यांनो शेत जमीन जाळू नका, जाणून घ्या..
खरिपाचे नियोजन कसे करायचे, शेतकऱ्यांनो जाणून घ्या...
अजून तीन दिवस पाऊस, गारपिटीचा शक्यता, 'या' ठिकाणी होणार पाऊस, जाणून घ्या..

English Summary: Farmers, learn modern feeding methods for milch animals, it will be beneficial.. Published on: 15 April 2023, 12:14 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters