यंदा भारतात साखरेच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली आहे. साखर उत्पादनात भारत मोठा उत्पादक बनत असल्यामुळे देशामध्ये साखरेला चांगला भाव मिळाला पाहिजे. सध्यातरी आपण उसाचे उत्पादन थांबवू शकत नाही. मात्र इतर धान्य उत्पादनातही वाढ झाली पाहिजे म्हणजे भारतात अधिकाधिक निर्यात वाढेल आणि आयात कमी होईल. ज्यामुळे शेतकरी सुखी होईल असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
दौंड तालुक्यातील पाटेठाण या ठिकाणी असलेल्या सीबीजी गॅस प्रकल्पाच्या उद्घाटनाला ते आले होते. श्रीनाथ साखर कारखान्याच्यावतीने हे सीबीजी गॅस प्रकल्प उभारण्यात आले आहे. तसेच कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्तानेदेखील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विनोद तावडे यांची देखील उपस्थिती होती. यावेळी ते बोलत होते.
मंत्री नितीन गडकरी पुढे असेही म्हणाले, आपल्या भारतात पेट्रोल, डिझेल १० लाख कोटी लिटर इतके आयात करावे लागत आहे. यावर आपण तोडगा शोधला पाहिजे. यासाठी विविध गाड्यांचा वापर करणे गरजेचे आहे. सध्या मी दिल्लीत हायड्रोजन गाडी वापरत आहे ती चालवण्यासाठी उत्तम आहे. अशा प्रकारच्या गाड्यांचा वापर करण्याचा सल्ला त्यांनी दिला. शेतकऱ्यांबाबत बोलताना ते म्हणाले की, देशातील शेतकरी अन्नदाता आहे तो आता उर्जा दाता झाला पाहिजे. अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांच्या पीक विम्याबाबत शेतकरी नेते राजू शेट्टी म्हणाले...
देशात जवळजवळ ४५० करोड इतक्या इथेनॉलची निर्मिती होत आहे. तर काही ठिकाणी बांबू पासून इथेनॉलची निर्मिती होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात इथेनॉलची कमतरता भासणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी पेट्रोल, डिझेलची गाडी न घेण्याचा सल्ला त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला. देशात आता पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल टाकण्याची परवानगी मिळाली आहे.त्यानुसार 1 हजार कोटी लिटर इथेनॉलची गरज पडणार आहे. आणि एवढ्या उत्पादनासाठी आपल्या साखर कारखान्यांमध्ये क्षमता नाही.
त्यामुळे आगामी काळात ऊसाचे दर तर कमी होणार नाहीत मात्र साखरेचे दर कमी होऊ शकते. असंही त्यांनी सांगितले. साखर उद्योग इथेनॉलकडे वळविणे ही काळाची गरज आहे. तसेच पेट्रोलियम मंत्र्यांशी बोलून पुण्यासारख्या ठिकाणी इथेनॉलचे पंप काढण्याचा आमचा निर्धार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.
इथेनॉल हे हरित इंधन असल्यामुळे प्रदूषण कमी होईल. यासाठी पुण्यातील इंडियन ऑईलचे तीन पंप सुरु करण्याची सूचना कंपन्यांना देण्यात येणार आहे. यातून शेतकऱ्यांना तर फायदा होईलच शिवाय पुण्यातील प्रदूषणही कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे आता सरकारने पुण्यात इथेनॉलचे पंप सुरु करण्याचा पुढाकार घ्यावा. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी इथेनॉलची निर्मिती आवश्यक आहे. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या:
राज्य सरकारची मोठी घोषणा; 'या' वन्य प्राण्यामुळे शेतातील मालमत्तेचे नुकसान झाल्यास मिळणार भरपाई
बारामतीच्या शेतकऱ्याचा नादच खुळा! आता 'कृषी-फळबागा पर्यटना'ला मिळणार चालना
Share your comments