सध्या शेतकरी पावसामुळे मोठ्या संकटात सापडला आहे. यामुळे शेतकरी मदतीची मागणी करत आहे. असे असताना आता अजून एक संकट शेतकऱ्यांवर आले आहे. नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील करंजाई परिसरात वीजतारांची चोरी आणि ट्रान्सफॉर्मर ऑईल चोरीच्या घटनांनी शेतकरी अडचणीत सापडला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आता लक्ष देण्याची गरज आहे.
या परिसरातील दहा ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल आणि 20 ते 22 खांबावरील विजांच्या तारांची चोरी झाली आहे. परिणामी रब्बी हंगामाच्या नियोजनासाठी शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. या तारा बाजारात महाग असून चोरांनी आता याला लक्ष केले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पिके धोक्यात आली आहेत.
सध्या रब्बी हंगामावर शेतकऱ्यांनी केंद्रित केले आहे. असे असताना मात्र त्यांना नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. चोरट्यांनी शेतशिवारातील शेतीला वीजपुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल आणि विजेच्या खांबावरील तारा चोरुन नेल्या आहेत. त्यासोबत पाच महिन्यात दुसऱ्यांदा ट्रान्सफॉर्मरमधील ऑईलची चोरी झाली आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत मात्र चोरट्यांचा तपास लागलेला नाही. यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. आता शेतकऱ्यांनी स्वखर्चाने ट्रान्सफॉर्मर काढून ऑईल भरण्यासाठी विद्युत वितरण कंपनीकडे दिले आहेत. असे असताना मात्र विद्युत वितरण कंपनी शेतकऱ्यांकडे वीज बिल भरण्याचा तगादा लावत आहे. यामुळे शेतकरी मात्र अडचणीत आला आहे.
सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी स्थिती नाही- कृषीमंत्र्यांची माहिती
दरम्यान, अस्मानी संकटाचा सांमना करत असताना चोरीच्या घटनांची सुलतानी संकटे शेतकऱ्यांसमोर उभी ठाकली आहेत. ऑईल चोरी करणाऱ्या टोळीचा शोध घेऊन तिला जेलबंद करण्याची मागणी आता शेतकरी करु लागले आहेत. राज्यात इतर अनेक ठिकाणी सुद्धा अशा घटना घडल्या आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
महत्वाच्या बातम्या;
'त्या' कारखान्यांना ऊस तोडणेसाठी अडथळा आणू नये, राजू शेट्टी यांचे कार्यकर्त्यांना आदेश
भोंग्याचा आवाज झाला आणि सभासदांनी जल्लोष केला! अखेर भीमा पाटस सुरू होणार
कोल्हापूरमध्ये भारतातील सर्वात मोठे अंडे! कोंबडीने घातले 210 ग्रॅम वजनाचे अंडे..
Share your comments