1. बातम्या

शेतकऱ्यांनो कृषिपंपावर लक्ष ठेवा!! एका रात्रीतून 10 कृषिपंप चोरीला

शेतकरी सध्या अनेक समस्यांचा सामना करत आहे. कधी भाजारभाव मिळत नाही तर कधी नैसर्गिक संकटांचा सामना त्याला करावा लागत आहे. यामुळे तो हतबल झाला आहे. असे असताना आता शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांना वेगळ्याच संकटाला सामोरे जावे लागत आहे. उन्हाळी हंगामातील पिके पाण्याला आली असतानाच आमदाबाद गावातील तब्बल 10 (Agricultural Pump) कृषिपंप हे चोरीला गेले आहेत.

Farmers agricultural pumps stolen

Farmers agricultural pumps stolen

शेतकरी सध्या अनेक समस्यांचा सामना करत आहे. कधी भाजारभाव मिळत नाही तर कधी नैसर्गिक संकटांचा सामना त्याला करावा लागत आहे. यामुळे तो हतबल झाला आहे. असे असताना आता शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांना वेगळ्याच संकटाला सामोरे जावे लागत आहे. उन्हाळी हंगामातील पिके पाण्याला आली असतानाच आमदाबाद गावातील तब्बल 10 (Agricultural Pump) कृषिपंप हे चोरीला गेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

यामुळे पिकेही पाण्याविना करपून जात आहेत. ऐन उन्हाच्या तडाख्यात कृषिपंपाची चोरी झाल्याने शेतीमालाला पाणी द्यायचं कसं याच्याच चिंतेने शेतकरी हतबल झाले आहेत. यंदा उन्हाळी हंगामातही जलस्त्रोतांचे पाणी हे टिकून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकांचा प्राधान्य दिले आहे. असे असताना विहिरींवरील कृषीपंपच गायब झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

आतापर्यंत सुरळीत विद्युत पुरवठा होत नसल्याने पिके धोक्यात होती आणि पाणी आहे, विद्युत पुरवठाही सुरळीत होत आहे असे असतानाही शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. यामुळे हा चोर शोधून काढण्याचे आवाहन आता पोलिसांसमोर आहे. एकाच रात्रीचत 10 कृषिपंपाची चोरी झाल्याने गावातील इतर शेतकऱ्यांचाही झोप उडाली आहे.

टोमॅटो आणि पेट्रोलचे दर सारखेच, शेतकरी त्रस्त व्यापारीच मालामाल

पोलीस प्रशासनाने यंत्रणा राबवण्याची मागणी शेतकऱ्यांनी पुणे ग्रामीण पोलिसांकडे केली आहे. सध्याच्या प्रतिकूल परस्थितीमध्ये कृषी पंप विकत आणायचे तरी कसे असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे आता हे नवीनच संकट शेतकऱ्यांपुढे उभे राहिले आहे. यामुळे आता इतर शेतकऱ्यांनी देखील आपल्या कृषी पंपाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

महत्वाच्या बातम्या;
मान्सूनच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना; भांडवल खर्चात होणार वाढ
घरात बसुन बांधावरची परिस्थिती कळेल का? जलजीवन मिशनबाबत धक्कादायक वास्तव आले समोर
म्हैस फक्त त्यालाच दूध काढून देते!! मग काय कपाळावर बाशिंग आणि नवरदेव काढतोय म्हशीचं दूध

English Summary: Farmers eye agricultural pumps !! 10 agricultural pumps stolen one night Published on: 30 May 2022, 04:18 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters