1. बातम्या

शेतकरी संकटात : आंबा फळबागांचे मोठे नुकसान, शेतकऱ्याची मदतीची मागणी

कळंब तालुक्यातील दिगंबर कापसे यांची 5 एकरातील आंबा अक्षरश: करपून गेला आहे. आंबा तोडणीला आला असतानाच ही परिस्थिती ओढावल्याने कापसे यांना बराच आर्थिक फटका बसला आहे.

ऋतुजा संतोष शिंदे
ऋतुजा संतोष शिंदे
5 एकरातील आंबा अक्षरश: करपून गेला आहे

5 एकरातील आंबा अक्षरश: करपून गेला आहे

सध्या आपत्कालीन परिस्थितीचा सर्वच शेतकरी वर्ग सामना करत आहेत. अवकाळी पावसाने मेहनतीने उगवलेल्या पिकांचे, फळबागांचे बरेच नुकसान केले आहे. शिवाय ते श्रमाचे आणि आर्थिक गोष्टींचे सुद्धा बरेच नुकसान झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका हा फळबागांना झाला आहे. फळबागांचे नुकसान झाल्याने त्यांचा दर्जा खालवला आहे. ऐन हंगामात झालेल्या या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. त्यातल्या त्यात आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे अमाप नुकसान झाले आहे.

मध्यंतरी मोहर लगडला असताना अवकाळीमुळे सुरु झालेले नुकसान अक्षरशः फळ लागेपर्यंत कायम राहिले. पाऊस नंतर आता उन्हामुळे देखील या फळपिकांचे नुकसान होत आहे. कळंब तालुक्यातील दिगंबर कापसे यांची 5 एकरातील आंबा अक्षरश: करपून गेला आहे. आंबा तोडणीला आला असतानाच ही परिस्थिती ओढावल्याने कापसे यांना बराच आर्थिक फटका बसला आहे. कापसे यांचे जवळजवळ लाखोंचे नुकसान झाले आहे. मात्र ही बाग नक्की कोणत्या कारणामुळे करपली आहे यावर प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे कृषी अधिकारी यांनी पंचनामा केला असून या बागेची ही अवस्था शॉर्टसर्किटमुळे झाली की वाढत्या उन्हामुळेच बाग कपरली याची पाहणी केली जात आहे.


मराठवाड्यात उत्पादन वाढीसाठी शेतकरी अमाप कष्ट घेत आहेत. नवनवीन प्रयोग करत आहेत. असाच प्रयोग कळंब तालुक्यातील दिगंबर कापसे यांनी केला. त्यांनी जवळजवळ 5 एकरावर आंबा बाग लावली. तोडणी काही दिवसांवर आली होती मात्र हे सर्व आंबे उन्हामुळे पूर्णत: भाजले आहेत. शिवाय त्याच्यावर आता कोणतीही प्रक्रिया कामी येणार नाही. यामध्ये 10 लाखाचे नुकसान झाले असून भरपाईची मागणी शेतकरी करीत आहेत. हंगामाच्या सुरवातीपासून निसर्गाची सुरु झालेली अवकृपा आता अंतिम टप्प्यातही कायम असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

Breaking :ज्वारीच्या लागवड क्षेत्रात आणि उत्पादनात घट; वाचा सविस्तर

ही फळबाग नक्की कोणत्या कारणाने करपली आहे यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी भेट दिली असता कृषी अधिकारीही चक्रावून गेले. गेल्या तीन वर्षापासून कापसे हे बाग जोपासत होते. बागेचा काही भाग हा शॉर्चसर्किटमुळे जळाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे लावला जात आहे. न भरुन निघणारे असे नुकसान कापसे यांचे झाले आहे. फळतोडणीच्या अवस्थेत झालेलं हे नुकसान कापसे यांना श्रमिक आणि आर्थिक फटका देऊन गेले.

वाढत्या उन्हामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. कारण मराठवाड्यातही ऊन्हाचा पारा वाढला आहे. सध्या 42 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान आहे. या वाढत्या तापमानाचा उन्हाळी हंगामातील पिकांवर परिणाम तर होत आहेच शिवाय फळबागांनाही त्याचा धोका निर्माण झाला आहे. आंबा फळपिकाची गळती झाली की तो एका भागाकडून भाजलाच जातो. त्यामुळे हे न भरुन निघणारे नुकसान असून भरपाईसाठी कापसे मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:
ऐ हुई ना बात ! पदाने IAS अधिकारी असताना देखील करतात शेती; कारण...
Mango Fruit: आंबा फळपिकाला सोनेरी दिवस! आता घेता येणार मनसोक्त आस्वाद

English Summary: Farmers in Crisis: Massive Loss of Mango Orchards, Farmers Demand Help Published on: 02 May 2022, 04:35 IST

Like this article?

Hey! I am ऋतुजा संतोष शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters