बाळापूर : तालुक्यातील प्रकल्पातिल गावात, कृषिविकास ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर, कॉटनकनेक्ट, तसेच बिसीआय प्रकल्पाच्या माध्यमातून प्रकल्प क्षेत्रातील गाव दगडखेड, सागद हाता येथिल शेतकरी तसेच शेतमजूर यांना किटकनाशक फवारतांना काय काळजी घ्यायला हवी याचे प्रशिक्षण देण्यात आले.
या मध्ये प्रकल्पाचे क्षेत्र प्रवर्तक सतिश गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, फवारणी करताना पूर्ण अंगभर कपडे असावे, हातात हॅन्डग्लोज असावे, डोळ्याला चष्मा, नाकाला मारक, डोक्याला रुमाल, तसेच पायात बुट घालूनच रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी.
हे ही वाचा: PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेवर कृषी मंत्री तोमर यांचं मोठं विधान...
आजपासून मोठे बदल..! शेतकऱ्यांपासून सर्वसामान्यांच्या जीवनावर पडणार प्रभाव.. घ्या जाऊन
तसेच गरोदर स्त्री ने फवारणी केलेल्या शेतातू जावू नये. आणि किटकनाशकांच्या डब्याची योग्य व्हिलेवाट लावावी म्हणजे ते फवारणी झाल्यानंतर, भंगार वाल्याला विकावी. त्याचा दैनदिन वापरासाठी वापर करू नये, याविषयी प्रकल्पाचे क्षेत्र प्रवर्तक सतिश गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.
हे ही वाचा: झुकेगा नहीं साला..! कापसाला मिळाला 16 हजाराचा उच्चांकी भाव
मोठी बातमी! कर्मचाऱ्यांना या महिन्यात, या तारखेला महागाई भत्त्याची रक्कम मिळणार...
Share your comments