गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. अनेक शेतकऱ्यांचे पिके पाण्यात वाहून गेली आहेत. अशी परिस्थिती असतानाच गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सध्या गव्हाच्या दरात (wheat rate) चांगलीच वाढ झाली आहे.
मागच्या सहा आठवड्यात गव्हाच्या किंमती 14 टक्क्यांची वाढ झाली आहे. गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. गव्हाच्या किंमतीत (wheat rate) वाढ झाल्यामुळं आता मैदा, सुजी, बिस्किटे आणि ब्रेड यासारखे पदार्थ महाग देखील होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या लहान व्यापारी आणि शेतकऱ्यांनी आपला गव्हाचा साठा विकण्यास सुरुवात केली आहे. पावसाळ्यामुळे पुरवठा कमी झाल्याने आणि दळणाची मागणी वाढल्यानं गेल्या सहा आठवड्यात गव्हाच्या किंमतीत (wheat rate) 14 टक्क्यांची वाढ झाली.
मत्स्यपालनासाठी सरकार देतंय 60% अनुदान ; सरकारच्या 'या' योजनेचा घ्या लाभ
या परिस्थितीवरून सध्या वाढत असलेल्या गव्हाच्या किंमतीच्या संदर्भात रोलर फ्लोअर मिलर्स असोसिएशनचे (Roller Floor Millers Association) उपाध्यक्ष नवनीत चितलांगिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या गव्हाच्या किंमती दररोज वाढत आहेत, त्या तुलनेत सध्या गव्हाची उपलब्धता देखील अत्यंत कमी असल्याची माहिती रोलर फ्लोअर मिलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष नवनीत चितलांगिया यांनी दिली.
उत्तर भारतात वितरित होणाऱ्या गव्हाची किंमत (wheat rate) जूनमध्ये 2 हजार 260 ते 2 हजार 270 प्रति क्विंटलच्या निचांकी वरुन आजपर्यंत 2 हजार 300 ते 2 हजार 350 पर्यंत वाढली आहे. त्यामुळं मोठ्या व्यापाऱ्यांना याचा फायदा होताना दिसत आहे. जागातिक गहू उत्पादनात रशिया आणि युक्रेनचा 29 टक्के आणि मक्याच्या उत्पादनात 19 टक्के वाटा आहे. सूर्यफूल तेलाच्या निर्यातीत या दोन्ही देशांचा 80 टक्के वाटा आहे.
शेतीतून लाखों रुपये कमवायचे आहेत? तर 'या' जोडव्यवसायातून लाखोंमध्ये घ्या कमाई
बार्ली उत्पादनात (Barley production) रशियाचा जगात दुसरा आणि युक्रेनचा चौथा क्रमांक लागतो. एकूणच जागतिक कृषी क्षेत्रात (Global agricultural sector) रशिया आणि युक्रेनचं मोठं योगदान आहे. दोन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे धान्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे सध्या गव्हाच्या किंमती वाढत असताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या
होय खरंय ! आता शेतकऱ्यांना स्वस्त मिळणार कृषी यंत्रे; केंद्र सरकारकडून अँप लाँच
कृषीमंत्र्यांचे मोठे वक्तव्य; 8 वर्षात लाखों शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट
कृषी यांत्रिकीकरण योजनेचे अनुदान बिल आजच जमा करा ; अन्यथा मिळणार नाहीत कृषी यंत्रे
Share your comments