1. पशुधन

शेतीतून लाखों रुपये कमवायचे आहेत? तर 'या' जोडव्यवसायातून लाखोंमध्ये घ्या कमाई

शेतकरी आपल्या शेतीतून चांगले उत्पादन काढण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु पूर्णता शेतीवर अवलंबून शेतकरी राहू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती व्यवसायासंबंधी जोड व्यवसाय करणे गरजेचे असते.

शेतकरी आपल्या शेतीतून चांगले उत्पादन (product) काढण्याचा प्रयत्न करत असतात परंतु पूर्णता शेतीवर (agriculture) अवलंबून शेतकरी राहू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती व्यवसायासंबंधी जोड व्यवसाय करणे गरजेचे असते. तर शेतकरी (farmers) कोणते व्यवसाय करू शकतो? ज्यातून त्याला चांगला नफा होईल? याविषयी सविस्तर माहिती घेऊया.

पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, मधमाशी पालन, मशरूम उत्पादन आणि अन्न प्रक्रिया इ. व्यवसायांचा समावेश शेतकरी सहज करू शकणाऱ्या व्यवसायांमद्धे होतो.

शेतकरी मित्रांनो: 'या' पिकांची अशी घ्या काळजी; मिळणार भक्कळ पैसा

पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय 

भारतात प्राचीन काळापासून शेतीसोबतच (agriculture) पशुपालनही (Animal Husbandry) केले जात आहे. शेतकरी शेतीसोबत हा व्यवसाय उत्तम करू शकतात. ही दोन्ही व्यवसाय एकमेकांना पूरक व्यवसाय आहेत. यातून शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो.

जनावरांसाठी जिथे हिरवा चारा शेतातून पुरविला जातो, तिथे गाई, म्हशी, शेळ्या, उंट इत्यादींचे संगोपन करून खताची गरज भागवली जाते. शेतकऱ्यांना दोन्हीकडून फायदा होऊ शकतो. या कामात सरकार विविध योजनांद्वारे शेतकऱ्यांना मदत करत आहे, ज्यामध्ये राष्ट्रीय गोकुळ मिशन, पशु किसान क्रेडिट कार्ड आणि पशुधन विमा योजना यांचा समावेश आहे.

'या' योजनेच्या 'ई-केवायसी' चे सर्व्हर डाउन ; शेतकऱ्यांवर ई-सेवा केंद्रांवर हेलपाटे मारण्याची वेळ

मत्स्यपालन 

जुन्या काळी मत्स्यपालन (Fish Farming) हे फक्त मच्छिमारांचे काम मानले जात होते, परंतु आज बहुतांश शेतकरी शेतात किंवा टाक्यांमध्ये तलाव बांधून मत्स्यपालन करत आहेत.

देशातील मासळीच्या वाढत्या वापरामुळे शेतीसोबतच मत्स्यपालनाचा व्यवसाय करणे फायदेशीर ठरू शकते. शेतीसोबतच मत्स्यपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू केली असून, त्याअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान देण्याचीही तरतूद आहे.

मधमाशी पालन आणि मध उत्पादन

देशात मध उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी, भारत सरकारने राष्ट्रीय मधमाशी (Beekeeping) आणि मध अभियान सुरू केले आहे, ज्या अंतर्गत मधमाशी पालन युनिट्स स्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्याची तरतूद आहे. शेतकर्‍यांना हवे असल्यास ऊस, मोहरीसह फुलांची लागवड करताना मधमाशी युनिटची लागवड करून मध उत्पादनातून चांगले उत्पन्न मिळवता येते.

'या' योजनेचा लाभ घेताना चुकीची माहिती देऊ नका; अन्यथा बसेल मोठा फटका

कुक्कुटपालन 

जगभर अंडाची मागणी झपाट्याने वाढत आहे. विशेषत: भारतात कोंबडीबरोबरच अंड्यांचा वापरही लक्षणीय वाढला आहे, त्यामुळे पोल्ट्री व्यवसायातून (Poultry business) शेतकऱ्यांचे (farmers) उत्पन्न रातोरात वाढू शकते. कुक्कुटपालनासाठी वेगळा खर्च करण्याची गरज नाही. शेतकर्‍यांना हवे असल्यास ते घराच्या अंगणात छोटेसे युनिट लावून कोंबड्यांच्या राहण्याची व्यवस्था करू शकतात.

मशरूम उत्पादन

मशरूम पिकवण्यासाठी (mushroom farming) शेतातील कोठारांची गरज नाही. मशरूम 6×6 च्या खोल्यांमध्ये देखील लागवड करता येते. मशरूम शेती करून तुम्ही बंपर उत्पादन आणि चांगले पैसे कमवू शकता.

लष्करी भागात तब्बल 50 हजार झाडे लावणार ; आयुक्त राजेश टोपे यांची मंजूरी

English Summary: earn millions rupees agriculture income lakhs affiliate business Published on: 20 July 2022, 11:58 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters