1. बातम्या

मान्सूनच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना; भांडवल खर्चात होणार वाढ

यंदा लवकरच मान्सूनचे आगमन झाल्याने राज्यात पाऊस होणार आहे. त्यामुळे पावसाळी पिकाची तयारी करत असताना शेतकऱ्यांची खत खरेदीसाठी लगबग सुरु झाली आहे. यंदा मात्र खतांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांचे भांडवलात वाढ होणार आहे. काही खतांच्या दरात कमालीची वाढ झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

farmers face monsoon increase in capital expenditure

farmers face monsoon increase in capital expenditure

यंदा लवकरच मान्सूनचे आगमन झाल्याने राज्यात पाऊस होणार आहे. त्यामुळे पावसाळी पिकाची तयारी करत असताना शेतकऱ्यांची खत खरेदीसाठी लगबग सुरु झाली आहे. यंदा मात्र खतांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांचे भांडवलात वाढ होणार आहे. काही खतांच्या दरात कमालीची वाढ झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. सगळ्याच खतांचे दर वाढल्याने शेतकऱ्याला पर्याय निवडणे देखील कठीण जाणार आहे.

तालुक्यासह मोठमोठ्या गावांमध्ये देखील खताच्या दुकानांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला खत खरेदीसाठी अनेक पर्याय उपलब्ध असले तरी खतांचे दरवाढल्याने केवळ खत कंपनी आणि विक्रेत्यांच्या फायद्यासाठी हे पर्याय खुले करण्यात आल्याचे बोलले जात आहे. शेतकरी पोटॅश, डीएपीची, 10.26.26, 20.20.0.13, 15.15.15, 16.20.0.13, युरिया या खतांचा वापर करताना आढळून येतो. काही दिवसांपूर्वी रशिया-युक्रेन युद्धामुळे खत दरवाढ झाली होती.

ही दरवाढ अद्याप कायम राहिल्याने या युद्धस्थितीचा परिणाम देशासह राज्यातील शेतकऱ्यांवर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर खत अधिक दराने खरेदी करून शेतकऱ्यांना कमी भावात उपलब्ध करत असल्याचे पंतप्रधान मोदी सांगत आहेत. त्यामुळे भविष्यात खताशिवाय शेतीचा पर्याय शेतकऱ्यांना निवडावा लागले असे दिसत आहे. शिवाय खताच्या वाढत्या मागणीमुळे सारखीच गुणवत्ता असल्याचे सांगत शेतकऱ्याला बोगस खत विकले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हवामान अपडेट: शेतकऱ्यांनो आजपासून मान्सून होणार दाखल, केरळमध्ये मुसळधार पाऊस सुरु..

त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधगिरीने परवानाधारक विक्रेत्याकडूनच खत खरेदी करण्याचे आवाहन कृषी संबंधित विभाग करत आहेत. शिवाय शेतकऱ्याने पक्के बिल घेणे आवश्यक असून फसवणूक झाल्यास याबाबत शेतकऱ्याला तक्रार देखील करता येणार आहे. मात्र या सगळ्यात शेती करणे शेतकऱ्याला आणखी अवघड होऊन बसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

महत्वाच्या बातम्या;
घरात बसुन बांधावरची परिस्थिती कळेल का? जलजीवन मिशनबाबत धक्कादायक वास्तव आले समोर
म्हैस फक्त त्यालाच दूध काढून देते!! मग काय कपाळावर बाशिंग आणि नवरदेव काढतोय म्हशीचं दूध
टोमॅटो आणि पेट्रोलचे दर सारखेच, शेतकरी त्रस्त व्यापारीच मालामाल

English Summary: farmers face monsoon increase in capital expenditure Published on: 30 May 2022, 03:12 IST

Like this article?

Hey! I am मनोज रामचंद्र दातखिळे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters