मे महिना संपत आला तरी शेतकऱ्यांसमोर अतिरिक्त ऊसाचा प्रश्न आहेच. याबाबत सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. अतिरिक्त ऊसाचा प्रश्न जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत साखर कारखाने चालू रहातील यांसारखे अनेक निर्णय राज्य सरकारने घेतले. शिवाय पश्चिम महाराष्ट्रातील ऊस तोडणी यंत्र मराठवाड्यातदेखील दाखल केले.
अजूनही राज्यात 15 लाख टनांच्यावर उसाचे गाळप शिल्लक आहे. मध्यंतरी मराठवाड्यातील लातूर, परभणी, जालना जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले होते त्यामुळे ऊसतोडणीची यंत्रे उसाच्या फडातही जाणे कठीण झाले होते. ऊस तोडणीचे काम काही काळासाठी रखडले होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दुष्काळात तेरावा महिना अशीच काहीशी परिस्थिती झाली आहे.
आता मात्र मराठवाडा, सोलापूर, उस्मानाबाद इतर भागातही ऊस तोडणीचे काम सुरु आहे. मराठवाड्यात जवळपास 50 टक्के कारखान्यांचा गाळप हंगाप संपुष्टात आला आहे. मराठवाड्यातील 60 कारखान्यांपैकी 28 कारखान्यांनी गाळप हंगाम आटोपला असून सर्व कारखान्यांनी 23 मे पर्यंत 3 कोटी 17 लाख 10 हजार 176 टन उसाचे गाळप केले. आणि 3 कोटी 16 लाख 97 हजार 990 क्विंटल साखरेचे उत्पादनदेखील केले. सध्या 32 कारखान्यांचे गाळप अजून चालूच आहे.
उद्घाटनाला पोहोचताच अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, अरे काय केलंय…
मागील वर्षी पेक्षा यंदा साखरेच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली आहे. राज्यातील साखर कारखाने सुरु आहेत मात्र ऊस तोडणीचे काम अद्यापही संपले नाही. कारखाने जवळ आहेत मात्र ऊसाला तोड नाही. यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. तसेच भारनियमनामुळे काही शेतकऱ्यांच्या उसाचे पीक हे शेतातच वाळत चालले असल्याचे चित्र आहे.
सध्या राज्यात जवळजवळ 16 लाख टनापेक्षा जास्त ऊस शिल्लक असून हा ऊस कारखान्याला जाण्यासाठी जून महिन्यातील दुसरा आठवडा उजाडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीड, उस्मानाबाद, यासह 30 हून अधिक साखर कारखाने हे ऊस संपेपर्यंत कार्यरत राहतील. असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
मोदी सरकारचा हरभरा उत्पादकांना मोठा धक्का; खरेदीवर केली बंदी;अजित पवार आक्रमक
एकीचे बळ! मल्चिंग पेपरचे गाव, आधी दुष्काळग्रस्त म्हणून ओळख, आता झाले बागायती
Share your comments