1. बातम्या

शेतकऱ्यांनो काळजी घ्या! शेतकऱ्यांच्या कृषिपंपाच्या केबलवर मारला जातोय डल्ला..

शेतकऱ्यांवर एकामागून एक संकटे येतच आहेत. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. आता आंबेगाव मधील घोडनदी किनारी असलेल्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या केबल चोरीला जात आहेत. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
agricultural pump cable

agricultural pump cable

शेतकऱ्यांवर एकामागून एक संकटे येतच आहेत. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. आता आंबेगाव मधील घोडनदी किनारी असलेल्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या केबल चोरीला जात आहेत. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

गेल्या आठ दिवसांपासून सतत चोरी होत आहे. यामुळे भराडी आणि निरगुडसर येथील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे या चोऱ्यांना आळा घालण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

शेतकरी कृषी पंप सुरू करण्यासाठी गेले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. ज्या शेतकऱ्यांच्या केबलमध्ये तांब्याच्या तारा होत्या, त्याच शेतकऱ्यांच्या केबलवर चोरटयांनी डल्ला मारला आहे. यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

नेतेच थकबाकीदार! औरंगाबादचे पालकमंत्री भुमरेंच्या पुत्राच्या नावावर 1 लाख 31 हजारांची थकबाकी

यामध्ये शेतकऱ्यांचे अंदाजे दोन लाख रुपयेहून अधिक नुकसान झाले आहे. याठिकाणी केबल चोरीच्या वारंवार घटना घडत आहेत. पोलीस प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून केबल चोरीच्या घटना रोखाव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

50 हजारांचे प्रोत्साहन अनुदानाची दुसरी यादी आली, 'या' दिवशी होणार जाहीर

शेतकऱ्यांनी पारगाव पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली आहे. तसेच निरगुडसर येथील मच्छिंद्र टाव्हरे यांचा शेतीपंपच चोरीला गेला आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. यामुळे कारवाईची मागणी होत आहे.

महत्वाच्या बातम्या;
राज्यात 5 हजार बायोगॅस उभारणार, अनुदानात झाली वाढ
राज्यात 5 हजार बायोगॅस उभारणार, अनुदानात झाली वाढ
ऊस शेती परवडणार! पठ्याने काढले 50 गुंठ्यांत थेट 120 टन ऊसाचे उत्पादन, वाचा शेतकऱ्याच व्यवस्थापन

English Summary: Farmers be careful!being killed on the cable of the farmer's agricultural pump. Published on: 06 December 2022, 03:32 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters