तलाठी कार्यालयात संबंधित तलाठी वेळेत येत नाही. शिवाय कार्यालयात मद्यपान करून येतात आणि शेतकऱ्यांची अडवणूक करून अरेरावीची भाषा करतात. असा आरोप अंबासन, ता. सटाणा येथील शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे संतप्त शेतकरी तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी तलाठी कार्यालयालाच कुलूप ठोकले.
जोपर्यंत या तलाठ्याची बदली होत नाही, तोपर्यंत कुलूप उघडणार नाही असा ठोस निर्णय या शेतकऱ्यांनी घेतला आहे. वायगाव येथील तलाठी कार्यालयाबाबत नेहमीच काही न काही तक्रारी समोर येत आहेत. शेतकऱ्यांना अनेक अडचणींतून जावे लागत आहे. याबाबतीत अनेक वेळा वरिष्ठ कार्यालयात तक्रारी करण्यात आली आहे मात्र तरीही संबंधित तलाठ्याकडून शेतकऱ्यांचे काम वेळेवर होत नाही.
कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या शेतकऱ्यांना संबंधित तलाठी हुसकावून लावतात. त्यामुळे वेळेत काम व सेवा वेळेत न मिळाल्याने शेतकऱ्यांचे बरेच आर्थिक नुकसान होत आहे. अवाजवी शुल्क आकारले जाते. दरम्यान प्रशासनाकडून ‘आजादी का अमृत महोत्सव’ या वर्षानिमित्त मोफत सातबारा वाटप करण्यास सांगण्यात आले होते. परंतु तलाठ्याने तेही काम केले नाही. तर बहुतांश शेतकऱ्यांना तलाठ्याच्या या निष्काळजीपणामुळे नुकसानभरपाईदेखील मिळू शकली नाही, असे तक्रारीत नमूद आहे.
विद्यार्थी, शेतकरी,महिलांनी सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांकडे तक्रार केली म्हणून सर्वांनी निर्णय घेऊन तलाठी कार्यालयास कुलूप लावले. तसेच गावातील शेतकरी व विद्यार्थ्यांनी सांगितले, की जर तलाठ्याची बदली झाली नाही, तर वायगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयालासुद्धा कुलूप लावण्यात येईल. नवीन तलाठ्याची नेमणूक करून शेतकऱ्यांची समस्या सोडवून न्याय द्यावा. असे व्यक्तव्य गावचे सरपंच अशोक आहिरे यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
बळीराजाचा सन्मान..! महाराष्ट्र पर्यटन व कृषी पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन
जमिनीविषयी शासन निर्णय! आता जिरायती जमीन कमीत कमी 20 गुंठे आणि बागायत जमीन 10 गुंठे करता येणार खरेदी
Weather Update : पाच दिवस अगोदरच दाखल होणार मोसमी पाऊस; IMD चा अंदाज
Share your comments