शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो, अनेकदा त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते. बाजारभावाचे बदलणारे चित्र त्यांच्या आर्थिक परिस्थितीला जबाबदार ठरते. आता याचाच प्रत्येय पुन्हा आला आहे. आता देवळा तालुक्यातील वासोळ येथील शेतकऱ्याने आर्ध्या एकरामध्ये (Fenugreek cultivation)
मेथी लागवडीचा प्रयोग केला होता. तीन महिने मेथी जोपासली पण आता विक्रीच्या दरम्यान दरात कमालीचा घट झाली आहे. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
यामुळे शेतकऱ्याने भाजीपाल्यावर चक्क रोटर फिरवून क्षेत्र रिकामे केले आहे. मेथी विक्रीसाठी घेऊन जायला देखील परवडत नाही. यामुळे शेतकऱ्याने हा निर्णय घेतला आहे. वासोळ येथील शेतकरी नारायण गिरासी यांनी अर्ध्या एकरामध्ये मेथीची लागवड केली होती. पारंपरिक पिकांमधून पदरी काहीच पडत नाही त्यामुळे त्यांनी हा प्रयोग केला. मात्र, मेथीचे घटते दर आणि वावरातच मेथीला फुले येऊ लागल्याने होणारे नुकसान टाळ्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला.
मेथी विक्रीला आली असतानाच बाजारपेठेतील दरात मोठी घसरण झाली. 10 रुपयाला अर्धा डझन पेंड्या देण्याची नामुष्की गिरासी यांच्यावर आली होती. त्यामुळे या मेथीवर अधिकचा खर्च करण्यापेक्षा वावराबाहेर काढणेच त्यांनी पसंत केले. मेथीची काढणी वाहतूक परवडत नसल्याने अनेक शेतकरी सध्या अडचणींचा सामना करत आहेत.
अजित पवारांच्या घराबाहेरील झाडांच्या फांद्या तोडण पडले महागात, गुन्हा दाखल
दरम्यान, उत्पन्न वाढीसाठी शेतकरी एक ना अनेक प्रयोग करीत आहे. केवळ (Main Crop) मुख्य पिकावर अवलंबून न राहता भाजीपाल्याचाही आधार घेतला जात आहे. मात्र याठिकाणी देखील त्यांच्या पदरी काहीच लागत नाही. यामुळे शेतकऱ्यांनी नेमकं करायचं तरी काय असा प्रश्न त्यांना पडला आहे. कांद्याचे दर सध्या काहीसे सुधारले आहेत.
महत्वाच्या बातम्या;
एक आमदार असाही! पाण्यासाठी मंत्रीपद नाकारले, पण लोकांना पाणी दिलेच..
शेतकऱ्यांनो शेळीपालन व्यवसायाकडे वळा, 'ही' ३५ कारणे तुम्हाला मिळवून देतील लाखो रुपये..
या नोटा तुमच्याकडे आहेत? असतील तर तुम्ही लखपती झालाच, याठिकाणी मिळतात लाखो रुपये..
Share your comments