लागवड करा औषधी गुणधर्म असलेल्या मेथीची

21 July 2020 11:21 PM


भाजीपाल्यामध्ये मेथी ही महाराष्ट्रातील लोकप्रिय असून मेथीचा वापर आहारात विविधप्रकारे करण्यात येतो. मेथीचे पिक हे खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात घेतले जाते. भाजीपाला पुरवठा करण्यासाठी जवळजवळ वर्षभर मेथीचे पिक घेता येऊ शकते.  मेथीमध्ये जीवनसत्व  अ, ब, आणि क, कॅल्शिअम, कॅरोटीन, लोह व प्रथिने असल्याने आरोग्यासाठी चांगले असते. मेथी ही पाचक असून यकृताची कार्यक्षमता वाढविते.  त्यामुळे पचनक्रिया चांगल्याने होते, तसेच मेथीच्या दाण्याचा वापर लोणचे व मसाले या पदार्थासाठी केला जातो.  मेथीचा भाजीही खुप पौष्टिक आहे. मेथीच्या भाजीचे अनेक प्रकाराचे पदार्थ बनविले जातात तसेच पराठे, थेपले व उंधियो या पदार्थासाठी बनविले जातात.  मेथीमध्ये औषधी गुणधर्म आहेत.  मेथीच्या हिरव्या पाने आणि कोवळ्या फांद्या खुडून भाजीसाठी वापरतात.

हवामान

मेथीचे पीक हे खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात घेता येते.  मेथी हे थंड हवामानात वाढणारे पिक आहे.  उष्ण हवामानात मेथी या पिकाची वाढ कमी होतो व त्यामुळे भाजीला चांगला दर्जा मिळत नाही. कसुरी मेथी ही थंड हवामान मानवते. त्यामुळे हिवाळ्यामध्ये या पिकाची लागवड करावी त्यामुळे मेथी कमी दिवसात तयार होऊन भाजीला चांगला दर्जा मिळतो.

जमीन

मेथी लागवडीसाठी लागणारी जमीन ही मध्यम ते कसदार व पाण्याचा चांगल्या पध्दतीने निचरा होणारी जमीन असावी.

मेथी लागवडीच्या जाती

  • कस्तुरी - या जातीची मेथीची वाढ सुरुवातीला सावकाश होते. या मेथीचे रोपे लहान झुडूपासारखे असतात. या मेथीची पाने लहान व गोलसर असतात.  कस्तुरी मेथी ही सुगंधित आणि स्वादिष्ट असते.  कस्तुरी या जातीची मेथी दोन महिन्यात तयार होते.
  • पुसा अर्ली बंचिंग - या जातीची मेथीची वाढ लवकर होते. या मेथीची पाने लांबगोल आणि मोठी असतात.  या मेथीच्या शेंगा लांब आणि बी मोठे असते.  स्थानिक ठिकाणी याच जातीचा लागवडीसाठी उपयोग केला जातो. या मेथीचा कोवळेपणा जास्तीत जास्त काळ टिकून राहतो.
  • मेथी नं. ४७ - ही मेथी ब-याच स्थानिक ठिकाणी या मेथीची लागवड केली जाते. या मेथीला लवकर फुल येत नाही व त्यातच कोवळेपणा जास्त टिकून राहतो.

खत व पाणी निजोजन

बियाणे टाकण्याअगोदर वाफ्यात कल्पतरू खताचा वापर एकरी ४५  ते ५०  किलो करावा.  शक्यतो रासायनिक खताचा वापर करू नये. कोवळी व लुसलुशीत भाजी मिळवण्यासाठी ४ ते ६ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. पाण्याचा नियमित पुरवठा केल्याने अधिक उत्पादन मिळवता येते.

किड व रोग नियंत्रण

मेथीवर रोग व किडीचा प्रादुर्भाव शक्यतो होत नाही.  पंरतु काही वेळा मर या रोगाचा प्रभाव दिसून येतो.  या रोगाच्या नियंत्रणासाठी पिक घेताना जमिनीची फेरपालट करावी.  बियाणे दाट पेरणी करु नये. पानावर ठिपके, केवडा यासारख्या रोगाच्या प्रादुर्भाव दिसून आल्यास ३ ग्रॅम मेटॅलॅक्झिल ३५% प्रतिकिलो या प्रमाणात बीचप्रकिया करावी.  भुरी या रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्यात विरघळणारे गंधक २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात एकत्र करून फवारणी करावी.

मेथी काढणी

मेथी ही भाजी पेरल्यापासुन  ३५  ते ४०  दिवसात काढणीला तयार होते. मेथीची काढणी करत असताना रोपटे मुळापासुन उपटून काढतात.  मेथीची पाने फुले येण्याअगोदरच काढणी करावी.  मेथी काढणी  दोन ते तीन दिवसाअगोदर पाणी दिल्यास भाजी काढणी सोपे जाते.  काढणीनंतर मेथीच्या योग्य आकाराच्या जुड्या बांधून जाळीदार कपड्यात व्यवस्थित रचून बाजारात विक्रीसाठी पाठवाव्यात.

उत्पादन

कस्तुरी मेथीचे हेक्टरी ६०० ते ७०० रुपये किलो इतके बियाणे मिळते.  आरोग्यदृष्ट्या मेथी फलदायी असल्याने बाजारपेठेत मेथीला मागणी ही जास्त असते.  

Cultivation Cultivation methi vegetables farming भाजीपाला उत्पादन भाजीपाला शेती मेथी लागवड मेथी पीक
English Summary: Cultivation the methi vegetables in farm

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.