आता कुठलाही सरकारी प्रकल्प किंवा महामार्ग तयार करायचा असेल तर त्यासाठी भूसंपादन करावेच लागते. मग हे भूसंपादन करताना शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला हा सरकारी नियमानुसार ठरवून दिला जातो.
अशाच प्रकारे बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला औरंगाबाद ते पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाची अधिसूचना जारी झाल्यानंतर जिल्ह्यातील बरेच बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर तसेच राजकारणी शेत जमिनीतून अधिक मावेजा मिळावा म्हणून क्रियाशील झाले आहेत.
काय आहे नेमके प्रकरण?
औरंगाबाद ते पैठण रस्त्याचे चौपदरीकरण करण्याच्या कामाची अधिसूचना निघाल्यानंतर या महामार्गा मध्ये जमीन जाणार आहे त्या जमिनीचा अधिक मावेजा मिळावा यासाठी जमीन मालकांनी एका रात्रीत शेतामध्ये आंब्याच्या बागा लावल्या. अवघ्या चार-पाच दिवसात ही आमराई उभी करण्यात आली असून यामागे मावेजा हेच कारण आहे.
या रस्त्याचे नोटिफिकेशन निघाल्यानंतर मोठे बिल्डर आणि नेतेमंडळींनी जमीन शोधायला सुरुवात केली व ती विकत देखील द्यायला सुरुवात केली. अनेक बिल्डर्स, कॉन्ट्रॅक्टर आणि नेतेमंडळी व राजकारण्यांनी जमिनी विकत घेऊन ठेवलेले आहेत. या जमिनीमधून महामार्ग टाकण्याचा प्रकार घडला आहे. आता तुम्ही म्हणाल महामार्ग मध्ये ज्या जमिनी जाणार ते आंब्याची झाडे लावण्याचे कारण काय? ते म्हणजे जमीन जेव्हा एखाद्या प्रकल्पासाठी संपादित केली जाते तेव्हाच सदरील जमिनी जर आंब्याचे झाडे असली तर अधिक मावेजा मिळतो.
. हा मावेजा देताना झाडाचे आताची असलेले वय आणि भविष्यात किती वर्ष त्यापासून फळ मिळेल आणि तेव्हा ची त्याची किंमत काय असेल या सगळ्या गोष्टींचा विचार करून मावेजा ठरवला जातो. जमिनीच्या पासून मिळणाऱ्या पैशापेक्षा झाडाचे पैसे अधिक मिळतात.तसेच जाणाऱ्या रस्त्याच्या मावेजा मिळावा त्यासाठी बड्या लोकांनी थेट रस्ताच वळवला असल्याचा आरोप देखील गेवराई तांडा येथील गावकऱ्यांनी केला आहे. गेवराई तांडा हे गाव औरंगाबाद पैठण रस्त्यावर असून अगदी छोटेसे गाव आहे. या गावासाठी बायपास देण्यात आलाय. हा देण्यात आलेला बायपास गावातील एकाही शेतकऱ्याच्या जमिनीतून जात नाहीये.
उलट श्रीमंत आणि बड्या लोकांच्या जमिनींना लाभ देण्यासाठी हा सगळा खटाटोप केल्याचे या मधून दिसून येते. यातील धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे नोटिफिकेशन निघाली त्याच्या केवळ पंधरा दिवस अगोदर काही जमीन खरेदी करण्यात आले आहेत. आणि विशेष म्हणजे उन्हाळ्यात मोठ्या आंब्याच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे.
रस्त्यासाठी जमीन अधिग्रहित करत असताना झाड मध्ये आली तर झाडाचा मावेजा देतांना झाडाचे आत्ता चे वय आणि पुढे किती काळ उत्पादन देईल आणि त्यावेळी त्याची किंमत काय असेल या सगळ्यांचं संशोधन केलं जातं. त्यामुळे मावेजा देताना आताची ही गाडी नेमकी कधी लावली यावर संशोधन केलं तर भविष्यात अशा प्रकारची शासनाची होणारी फसगत थांबेल. (स्त्रोत-एबीपी माझा)
Share your comments