1. यशोगाथा

वय वर्ष 24 असलेला बोदड(चांदूर बाजार)चा विपुल चौधरी आहे संत्रा बागेचा मास्टर; यशाचा आलेख बघून व्हाल थक्क!

शेती म्हटले म्हणजे घाट्याचा सौदा अशा आशयाचे मत सध्या तरुणांमध्ये आहे. खरे पाहायला गेले तर त्यामागे तशी कारणे देखील आहेत. यामागील सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे शेतीचे असलेले निसर्गावरील अवलंबित्व हे होय.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
sucsess story of vipul choudhary

sucsess story of vipul choudhary

शेती म्हटले म्हणजे घाट्याचा सौदा अशा आशयाचे मत सध्या तरुणांमध्ये आहे. खरे पाहायला गेले तर त्यामागे तशी कारणे देखील आहेत. यामागील सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे शेतीचे असलेले निसर्गावरील अवलंबित्व हे होय.

आजकालचे तरुण हे आपल्या वडिलांची परिस्थिती पहात पहात लहानाचे मोठे होतात. त्यामुळे त्यांना कळायला लागते की, शेतीवर अवलंबून राहून आयुष्याचा पुढचा प्रवास करणे म्हणजे कठिण हे जवळ जवळ त्यांच्या डोक्यात पक्के होते. परंतु आता बरेच तरुण व्यावसायिकदृष्ट्या शेतीकडे पाहत असून शेतीला आपल्या करिअरबनवीत आहेत.बर्‍याच तरूण शेतकऱ्यांचे शेतीतील भन्नाट उपक्रमपाहूनअक्षरशः थक्क व्हायला होते.शेतीमध्ये बरेच तरुणअत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अगदी सहजतेने वापर करताना दिसतात व यश मिळवतात.या लेखामध्ये आपण अशाच एका अवघ्या चोवीस वर्षे वय असलेल्या तरुण शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्याला संत्रा बागेचा मास्टर असे जरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

नक्की वाचा:विपुल चौधरी या तरुण शेतकऱ्यांचे मनोगत! शेतकर्यांनी शेती करावी का? सरकारचे धोरण शेतकऱ्याचे मरण

 विपुल यांचे प्रेरणादायी यशोगाथा

 विपुल गजाननराव चौधरी ( 24)हे बोदड ता.चांदूरबाजार जि. अमरावती या गावाचे रहिवासी आहेत. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण बोदड या गावी झाले. वडील त्यांचे शेतकरी आहेत. लहानपणापासून विपुल त्यांच्या वडिलांचे कष्ट जवळून पाहत होते. त्यांचे वडील एक संत्रा उत्पादक शेतकरी असून सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत शेतामध्ये राबराब राबायचे. परंतु तरीदेखील दोन वेळचे जेवण मिळेल एवढे सुद्धा उत्पन्न या शेतीतून निघत नव्हते.

जे काही उत्पन्न या शेतीतून यायचे ते परतयेणाऱ्या हंगामासाठी शेतीला वापरले जायचे. त्यामुळे घरातील उदरनिर्वाह व मुलांचे शिक्षण सुद्धापूर्ण करणे कठीण होते. या सगळ्या परिस्थितीमध्ये विपुल मोठ्या कष्टाने दहावीपास झाले. त्या मध्यंतरी ते त्यांच्या वडिलांना शेतीत मदत करायचे. एवढ्या बिकट परिस्थितीत विपुल यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. परंतु  वडिलांना मदत म्हणून जेव्हा ते शेतीत काम करायचे तेव्हा ते वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग शेतीमध्ये करायचे. परंतु त्या प्रयोग करायलाकुठलाही खर्च येणार नाही याकडे लक्ष द्यायचे. वडिलांचीपरिस्थिती पाहून विपुल यांनी ठरवले होते की, यातून जर आपल्याला मार्ग काढायचा असेल व पुढे जायचे असेल तर तो स्वतः काढावा लागेल व या अनुषंगाने विपुल अनेक प्रकारचे प्रयोग शेतीमध्ये करू लागले. जसे की वेगवेगळ्या झाडांची पाने शिजवून त्याचे स्प्रे घेऊन फवारणी तसेच त्याचीच खते टाकायची. घरची परिस्थिती बेताची असल्याने पिकाला खते देणे देखील जिकिरीचे होते. त्यामुळे ते अशा झाडांचा पाला आणि काडीकचरा कुजवून त्याचा खत म्हणून उपयोग करायचे.नक्की वाचा:ऊस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! अतिरिक्त ऊसावर भेटणार अनुदान, राज्य सरकारचा यावर मोठा निर्णय

 एक एक प्रयोगातून तयार केला यशाचा रस्ता

 अशा प्रकारचे प्रयोग शेतात करत असताना विपुल यांच्या लक्षात आले की जर झाडावर पानांची संख्या भरपूर असली तर झाडावर रोगांचा प्रादुर्भाव होत नाही. संत्रा बागेसाठी झाडावर पाण्याचे प्रमाण जास्त कशी राहील याकडे विपुल यांनी लक्ष पुरवले. कारण त्यांना दिसून आले होते की या माध्यमातून फळांची कॉलिटी देखील उत्तम राहील व येणारे उत्पन्न सुद्धा वाढेल. त्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले.

म्हणतात ना अशा कठीण वाटेवर चालत असताना जर कोणाचे मार्गदर्शन लाभले तर वाट आणखी सुकर होते. याचे प्रत्यंतर विपुल यांना आले. त्यांचे प्रयत्न चालू असताना त्यांना रविदादा अर्डक यांचे बहुमोल मार्गदर्शन त्यांना या खडतर वाटेत लाभले. विपुल यांना त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत गेल्यामुळे आणि विपुल यांचे स्वतःचे जिद्द आणि चिकाटीने सुरू असलेले प्रयत्न यामधून विपुलने स्वतःचे बीएससी पर्यंतच्या शिक्षण देखील पूर्ण केले. त्यामुळे विपुल हे रविदादा यांना स्वतःचे गुरु मानतात.

 आज मोठे संत्रा उत्पादक शेतकरी म्हणून ओळख

 या सगळ्या कठीण परिस्थितीमधून मार्ग काढीत अभ्यासू वृत्तीने प्रयत्न करीत विपुल यांनी स्वतःची एक वेगळी ओळख तयार केली असून त्यांना आज या परिसरात मोठा संत्रा उत्पादक शेतकरी म्हणून ओळखले जाते. या यशाबद्दल विपुल सांगतात की, माझ्या पाठीवर आई, वडील आणि गुरूंचे आशीर्वाद असल्याने संत्रा मधून लाख रुपये घेणे माझ्यासाठी मोठी गोष्ट नाही. लहानपणापासून वडिलांचे शेतीतील कष्ट पाहून विपुल यांनी ठरवले आहे की महाराष्ट्र मधले जेवढे काही शेतकरी आहेत त्या सर्वांना एक आदर्श शेतकरी म्हणून नक्कीच नावारूपाला आणायचं.  त्यासाठी फक्त शेतकऱ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असावा. विपुल त्यांचे हे ध्येय  पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असून आतापर्यंत 20 टक्के शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचले आहेत आणि काही वर्षात 80 टक्के शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी संत्रा उत्पादक शेतकरी राजीव गांधी पुरस्कार प्राप्त शेतकरी अनुप दादा गांजरे यांचादेखील  विपुलच्या पाठीशी खूप मोठा वाटा आहे. याबाबतीत विपुल यांचे बाबा म्हणतात की एवढ्या कमी वयात एवढी मोठी कामे करणे शक्यच नाही परंतु ती कामे विपुलणे  मोठ्या सहजतेने करून दाखवली.

नक्की वाचा:जनावरांच्या पोटातील जंत किडे निघून जातील; जाणून घ्या काय आहे 'हे' औषध

विपुलचे हे काम पाहून चांदूरबाजार परिसरातील शेतकरी देखील थक्क झाले आहेत. जर तुम्ही झोपेत जरी विपुल यांना संत्रा फळबाग  बद्दल काही विचारले तर त्याचे उत्तर तुम्हाला काही क्षणात ते देऊ शकतात. कारण याबद्दलचे त्यांना अभ्यास व ज्ञान आहेच परंतु या क्षेत्रातलं प्रत्यक्ष अनुभवातून मिळालेले ज्ञान देखील त्यांच्याकडे भरपूर आहे.

तुम्ही संत्रा बद्दल काहीही जरी विचारले तरी त्याचे उत्तर तुम्हाला लागलीच मिळते. त्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचा युट्युब व गुगल ची मदत घ्यायची आवश्यकता नाही. म्हणून म्हणतात ना जिद्द आणि चिकाटी तसेच निवडलेल्या क्षेत्रात प्रचंड अभ्यास आणि कष्ट करून हमखास पुढे जाता येतं. याचे उत्तम उदाहरण म्हणजे विपुल चौधरी हे तरुण शेतकरी होय.

 तरुण संत्रा उत्पादक शेतकरी

 विपुल गजाननराव चौधरी

मो. नं.9588462272

रा. बोदड ता. चांदूर बाजार

( अमरावती)

English Summary: vipul chaoudhry is orange productive farmer in chandurbaajar amravati Published on: 12 April 2022, 09:15 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters