सध्या आसामध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. यामुळे परिस्थिती खूपच भयानक झाली आहे. यामुळे सध्या मदतकार्य सुरू आहे. सध्या भूस्खलन आणि पुराच्या पाण्याने (land slide and flood) राज्य मोठ्या संकटात सापडले आहे. सध्या आसाममध्ये पूरस्थितीने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. 45 लाख 34 हजार नागरिकांना पुराचा सामना करावा लागत आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. येथील मंत्री मात्र महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांवर लक्ष ठेवत आहेत.
आसाममधील ब्रह्मपुत्रा आणि बराक या नद्यांसह त्यांच्या उपनद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असून पाणी पातळीत वाढ होत चालली आहे. आसाम मधील पूरबळींची संख्या 108 वर पोहोचली आहे. हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. सिलचर हा संपूर्ण भाग पाण्याखाली गेला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने पूरग्रस्त भागात विशेषतः कचर भागात पथके नेमली आहेत. परिस्थिती कधी आटोक्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची पथके, 207 कर्मचाऱ्यांना बोलावले आहे. लष्कराच्या पथकांसह 120 सदस्य दीमापूर येथे तैनात केले आहेत. त्यांच्यासोबत नऊ बोटीदेखील आहेत. राज्य, राष्ट्रीय आपत्ती निवारण दले, सीआरपीएफचे जवान सिलचर भागात तैनात केले आहेत. सरकारकडून मोठ्या प्रमाणावर मदत केली जात आहे. अनेक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
कारल्यातून लाखोंची कमाई! उत्पादनाबरोबरच वाढीव दराने शेतकऱ्यांना सुगीचे दिवस
सरकारकडून हेल्पलाईन नंबरही जारी करण्यात आले आहेत. सध्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा आणि औषधांचा तुटवडा भासत आहे. खाद्यपदार्थांची पाकिटे, पाण्याच्या बाटल्या आणि इतर गजेच्या वस्तू हवाईदलाच्या हेलिकॉप्टरमधून या भागात टाकली जात आहेत. मात्र नागरिकांचे हाल सुरू आहेत. 103 महसुली विभागातील 4536 गावे पुरात वेढली गेली आहेत. यामुळे शेतीचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
महत्वाच्या बातम्या;
चिखलातून वाट, दुचाकी ट्रकमधून प्रवास, लंघुशंकेचं कारण देत शिवसेना आमदार आले पळून...
'माझं काम ठोकायचं, गद्दारांना सोडणार नाही'
आता 'एक देश एक रेशन कार्ड', तुमच्या फायद्यासाठी देशभरात नवी योजना लागू
Share your comments