गेल्या गळीत हंगामात Sugarcane Crushing अतिरिक्त उसाचा प्रश्न चांगलाच पेटला होता. अनेकांनी आपले ऊस पिऊन दिले तर काही शेतकऱ्यांनी आत्महत्या देखील केल्या. यामुळे गाळपाचे नियोजन नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. आता मात्र तसे काही घडू नये म्हणून प्रशासन तयारी करत आहे. यामुळे यावर्षी तरी आपला ऊस लवकर जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
यावर आता तोडगा म्हणून दरवर्षीच्या वेळापत्रकाच्या सुमारे 15 दिवस अगोदर म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून 2022-23 हंगामासाठी कारखान्यांना ऊस गाळप सुरू करण्याची परवानगी देण्याची शिफारस पुण्यातील साखर आयुक्तालयाने राज्य सरकारला केली आहे. यामुळे सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील सरकारने हा निर्णय घेतला होता. मात्र सरकार पडल्याने आता पुन्हा निर्णय घ्यावा लागणार आहे.
चालू हंगामात ऊसाचे प्रमाण जास्त आहे. राज्यात ऊसाचे जास्त उत्पादन झाल्याने मागील हंगाम 15 जूनपर्यंत चालला होता. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. सहकार मंत्री अतुल सावे म्हणाले की, साखर आयुक्तालयाने गळीत हंगाम लवकर सुरू करण्याची सूचना केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखालील समिती सप्टेंबरच्या मध्यापर्यंत यावर निर्णय घेईल.
आता उद्धव ठाकरेसोबत मराठा ताकद! संभाजी ब्रिगेडनंतर आता मोठ्या संघटनेने दिला पाठिंबा..
हंगाम लवकर सुरु केल्यास अतिरिक्त ऊसाचा प्रश्न उद्भवणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. यावेळी, साखर आयुक्तालय शेवटच्या उसापर्यंत गाळप व्हावे यासाठी आणखी 400 तोडणी यंत्रे घेण्याचे नियोजन करत आहे. यामुळे नियोजन होण्याची शक्यता आहे.
ब्रेकिंग! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या भेटीला, चर्चांना उधाण..
यासाठी प्रशासन सज्ज झाले असून गेल्या हंगामात राज्यात विक्रमी उसाचे गाळप झाल्याने देशातील सर्वाधिक साखरेचे उत्पादन केले. इथेनॉल उत्पादनातही राज्य अव्वल आहे. अधिक इथेनॉलचे उत्पादन करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी साखर कारखाने करत आहेत. याचा अधिक फायदा होईल.
महत्वाच्या बातम्या;
काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्याची हत्या, मृतदेह आढळल्याने खळबळ..
ब्रेकिंग! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात गुन्हा दाखल, काय आहे नेमकं प्रकरण..
पोल्ट्रीत पुराचे पाणी शिरल्याने ८५०० कोंबड्यांचा मृत्यू, शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
Share your comments