स्वाभिमानी शेतकरी संघटना व पक्षाची बुलढाणा जिल्ह्यातील घाटावरील व घाटाखालील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक अत्यंत जोशपूर्ण वातावरणात पार पडली. स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर, बुलढाणा येथे झालेल्या बैठकीत विविध विषयांवर पदाधिकऱ्यांनी आपली मते दिलखुलासपणे मांडली.
यावेळी संघटना व पक्षीय पातळीवरील काही नियुक्त्या जिल्हा कार्यकारिणीच्या मान्यतेने करण्यात आल्या. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (घाटावरील) जिल्हाध्यक्ष पदी डॉ.ज्ञानेश्वर टाले व पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदी बबनराव चेके व विद्यार्थी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी पवन देशमुख यांची फेरनिवड करण्यात आली.
तर अल्पसंख्याक आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी शेख जुल्फेकार यांची निवड करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (घाटाखालील) जिल्हाध्यक्ष पदी अमोल राऊत यांची निवड करण्यात आली व युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी अनंता मानकर, अल्पसंख्याक आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी मासुम शहा यांची फेरनिवड करण्यात आली.
पुणे बाजार समितीला आली जाग, ९३ अडत्यांवर कारवाई, लाखांचा दंड वसूल...
तर पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदी अनंदा अटोळे (खामगाव) यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख पदी श्याम अवथळे यांची निवड करण्यात आली.
सर्व नवंनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रभर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमकपणे ताकदीने काम करण्याचा निर्णय या बैठकीत करण्यात आला.
लासलगावात टोमॅटोला प्रतिक्रेट ५,१०० रुपये दर, टोमॅटोला दर टिकून असल्याने शेतकरी सुखावला...
अखेर शेतकरी वाट बघत असलेली बातमी आलीच! आता शेतीचे पंचनामे होणार अचूक आणि जलद, अँपची झाली निर्मिती
आता माती परिक्षणाची कामे उरकणार! कृषी विद्यापीठांकडून पोस्टाची मदत घेण्यात येईल, कृषिमंत्र्यांची माहिती
Share your comments