1. बातम्या

आनंदाची बातमी : अतिरिक्त ऊसाचे पूर्ण गाळप होणार : साखर आयुक्त

यंदा राज्यात ऊसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. मोठया प्रमाणात उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे गाळपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अद्याप अनेक शेतकऱ्यांचा ऊस शेतातच आहे. त्यामुळे आता मे महिना पूर्ण कारखाने सुरु राहणार आहेत.

अतिरिक्त ऊसाचे पूर्ण गाळप होणार : साखर आयुक्त

अतिरिक्त ऊसाचे पूर्ण गाळप होणार : साखर आयुक्त

यंदा राज्यात ऊसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. मोठया प्रमाणात उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे गाळपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अद्याप अनेक शेतकऱ्यांचा ऊस (Excess sugarcane) शेतातच आहे. त्यामुळे आता मे महिना पूर्ण कारखाने सुरु राहणार आहेत.

अतिरिक्त ऊसाचे पूर्ण गाळप होणार

आत्ता राज्यातील अनेक जिल्ह्यात ऊस गाळपाविना शिल्लक आहे. राज्यातील अहमदनगर, जालना, बीड, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक आहे. आता राज्यातील अतिरीक्त उसाचे गाळप पूर्ण होईल असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

आज पर्यंत सर्वात जास्त उसाचे गाळप सोलापूर जिल्ह्यात झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 293.30 लाख मेट्रीन टन उसाचे गाळप करण्यात आले आहे, त्यांनतर पुणे जिल्ह्यात 264 लाख मेट्रीन टन उसाचे गाळप झाले आहे.

कृषिप्रधान देशाचा कणा "शेतकरी"
आता 'या' कारणामुळे बिअरचे दर वाढणार...

कोल्हापूर जिल्ह्याचा क्रमांक लागतो. कोल्हापूर जिल्ह्यात 253 लाख मेट्रीन टन उसाचे गाळप झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर हंगाम जवळपास संपुष्टात आला आहे. पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात आत्ता पण काही साखर कारखाने सुरु आहेत.

राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच तोडणी यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळे उताऱ्यात घट होत आहे. अनेक ठिकाणी ऊस शिल्लक आहे. त्यामुळे उसाचे लवकरात लवकर गाळप व्हावे यासाठी राज्य मंत्रीमंडळाने अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; राजू शेट्टींचा थेट केंद्र सरकारला इशारा
IT RETURNS : आयटी रिटर्न डिव्हिजन मध्ये बदल

English Summary: Excess sugarcane will be completely crushed: Sugar Commissioner Published on: 04 May 2022, 02:26 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters