1. कृषीपीडिया

कृषिप्रधान देशाचा कणा "शेतकरी"

भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. पण आपल्याच देशात शेतकऱ्यांची स्थिती दयनीय झाली आहे. दुष्काळ, अतिपाऊस यामुळे शेतीची मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. हवामान बदलांमुळे शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. पण आपल्याच देशात शेतकऱ्यांची स्थिती दयनीय झाली आहे. दुष्काळ, अतिपाऊस यामुळे शेतीची मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. हवामान बदलांमुळे शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मातीची सुपीकता कमी होणे, एकरी उत्पन्न कमी होने अशा अनेक संकटांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.

अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. यामध्ये अन्न ही त्याची सर्वांत प्राथमिक अशी मूलभूत गरज आहे. मानवी जीवनामध्ये कृषिक्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अन्नधान्याच्या बाबतीत परावलंबी असलेला देश आपला स्वाभिमान टिकवू शकत नाही. या पार्श्वभूमीवर, भारत देशामध्ये हरितक्रांतीची बीजे रोवली गेली.

१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर औद्योगिकदृष्ट्या अत्यंत अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या राज्यातील ५५ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या आजही चरितार्थासाठी शेतीवर अवलंबून आहे. या शेतीचा विकास करण्यासाठी कृषि संशोधन, कृषिविषयक योजना आणि संशोधित तंत्रज्ञान प्रभावी रीतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.

उन्हाळ्यात दुभत्या म्हशींचे व्यवस्थापन...

शेतकरी जुगाराचे खेळ खेळतात, त्यांनाही पिकाचे पैसे होतील की नाही याचा काडीमात्र अंदाज नसतो. एखादं पीक जोरात आलं असेल आणि त्यावर त्या शेतकऱ्याने आपल्या मुलांना की कुटूंबाला काही आश्वासने दिली असतील आणि नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा पडलेल्या बाजारभावामुळे ती आश्वासने तो पूर्ण करू शकत नाही, ही अवस्था जेव्हा बदलेल तेव्हाच आजचा शेतकरी खऱ्या अर्थाने पूढे गेला असे म्हणता येईल.

अजितदादा तुम्ही शेतकरी, तुम्हाला शेतीतील चांगले कळते : उद्धव ठाकरे

अशा प्रकारे वेळ या जगात कोणावर येत नाही. शेतकरीच ते दुःख पचवतो. शेतकऱ्यांच्या मुलाला आणि बायकोला अशी अनेक दुःख पचवावी लागतात. आणि हीच परिस्थिती आपल्याला बदलायची आहे. म्हणजे कोणत्याच मंत्र्यांचा मुलगा आपल्या अंगावर गाडी घालणार नाहीत. यासाठी काम करायचे आहे.

"शेती हे असे क्षेत्र आहे की, ज्यादिवशी शेतीचा शेवट होईल त्यादिवशी जगाचा अंत होईल." असे असताना देखील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांची परिस्थिती आहे अशीच आहे. मुलगा नोकरीला असला तरी शेती आहे का विचारलं जात मात्र मुलगा शेतकरी असला की त्याला लग्नाला नकार दिला जातो.

ठरलं तर! पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता 'या' तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार

डॉक्टरचा मुलाला बाप म्हणतो डॉक्टर हो, इंजिनिअर असलेला बाप आपल्या मुलाला इंजिनिअरिंग कर म्हणतो, पण अस कधीच होत नाही की शेतकरी आपल्या मुलाला शेतकरीच हो असे म्हणत नाही, कधीच नाही. आणि जोपर्यंत तो म्हणत नाही तोपर्यंत शेतकरी सुधारला नाही असं ओळखून घ्यायचं, आणि हीच परिस्थिती शेतीबाबत सुधारवण्याठी काम करायचं आहे.

लेखक
पाराजी आबासाहेब शिंदे
उप-संपादक कृषी जागरण.
मो.नं. 98188 75395
paraji@krishijagran.com

राजू शेट्टींचा शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्यावर जोरदार घणाघात, म्हणाले...

English Summary: "Farmers" the backbone of an agrarian country Published on: 03 May 2022, 10:04 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters