सध्या महाराष्ट्र मध्ये सर्वदूर पाऊस कोसळत असून जुलै महिना सुरू झाल्यानंतर मान्सूनच्या पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होऊन संपूर्ण महाराष्ट्रात थोड्याफार फरकाने पाऊस पडत आहे. या जुलै महिन्याच्या दहा दिवसांचा विचार केला तर मराठवाड्यात अपेक्षित पर्जन्यमान 60.1 सरासरी अपेक्षित असताना याच्या दुप्पट म्हणजेच 124.8 मिमी जास्त पाऊस झाला आहे
जून मधील पावसाची तूट भरून एकूण 40 दिवसात 34 टक्के जास्त पाऊस पडण्याचा विक्रम झाला. त्यामुळे मराठवाड्यातील या पावसाने खरीप पिकांना जीवदान दिले असून राहिलेल्या पेरण्यांना देखील मोठ्या प्रमाणात चालना मिळायला मदत झाली आहे.
तसेच या पावसामुळे जमिनीची खालावलेली पाण्याची पातळी वाढवण्यासाठी देखील फायदा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीला अगदी पहिल्या पंधरा दिवसांचा विचार केला तर खूप कमी पाऊस झाला. काही ठिकाणी थोडे फार पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे चांगल्या पावसाच्या सरी कोसळल्या.
परंतु जून महिन्यात पावसाचे वितरण हे चांगल्या फरकाने राहिले. यामध्ये बीड जिल्ह्यात सर्वाधिक 120 टक्के, औरंगाबाद मध्ये 110.2, लातूर मध्ये 105.8, जालन्यात 99, उस्मानाबाद मध्ये 83, नांदेडमध्ये 91, परभणी मध्ये 94 आणि हिंगोली सर्वात कमी 71 टक्के पाऊस पडला होता.
त्यामुळे मराठवाड्यातील 200 पेक्षा जास्त मंडळांमध्ये पेरणी करता येईल असा पाऊस झालेला नव्हता व त्यामुळे बऱ्याच प्रमाणात पेरण्या खोळंबल्या होत्या आणि काही पेरण्या करण्यात आलेल्या होत्या परंतु उगवलेले पीक करपायला लागले होते
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची चिंतेचे वातावरण होते. परंतु जुलै महिन्यामध्ये पावसाला चांगले वातावरण तयार झाल्यामुळे कमी अधिक फरकाने सगळीकडे पाऊस पडत आहे.
गेल्या दहा दिवसांचा विचार केला तर या दहा दिवसात पडलेल्या पावसाने जून मधील तूट भरून काढली आहे. त्यामुळे शेतकरी राजाला सगळ्यात मोठा दिलासा मिळाला असून सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे.
Share your comments