1. हवामान

Rain Update: पावसाचा धुमाकूळ! महाराष्ट्र, तेलंगणा समवेत या राज्यांना हवामान विभागाने जारी केला रेड अलर्ट

Rain Update: मुसळधार पावसामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्याचबरोबर छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि तेलंगणासह देशातील अनेक भागांत पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
rain update

rain update

Rain Update: मुसळधार पावसामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्याचबरोबर छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि तेलंगणासह देशातील अनेक भागांत पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

IMD ने विदर्भ, किनारी आंध्र प्रदेश आणि छत्तीसगडच्या लगतच्या भागांसह इतर अनेक भागात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये अतिवृष्टीबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुढील चार दिवस देशाच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. डोंगराळ आणि किनारी भागात परिस्थिती वाईट आहे.  हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे ढगफुटीमुळे मोठी दुर्घटना घडली, तर मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यात ढगफुटीमुळे आलेल्या अचानक आलेल्या पुरात 17 जणांचा मृत्यू झाला असून 44 जण जखमी झाले आहेत. ढगफुटीच्या वेळी पीडित अमरनाथ गुंफा मंदिराजवळ तळ ठोकून होते. अचानक आलेल्या पुरात छावणीचा काही भाग वाहून गेला.  जम्मू-काश्मीरमधील तीन डझनहून अधिक यात्रेकरूंचा शोध लागलेला नाही.

सरयू आणि गोमतीसह अनेक नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. सरयू नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने बागेश्वर येथील बागनाथ मंदिराजवळ नदीचे पाणी पोहोचले आहे. एक दिवस आधी शनिवारी सरयूची पाणीपातळी 867.20 मीटर, तर गोमतीची 863.90 मीटर होती. या दोन नद्यांची चेतावणी पातळी 869.70 मीटर आहे आणि धोकादायक पातळी 870.70 मीटर आहे.

मान्सूनने संपूर्ण भारतात दणका दिला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय हवामान खात्याने पुढील चार दिवस मध्य भारत आणि पश्चिम किनारपट्टीवर सक्रिय मान्सून स्थितीचा अंदाज वर्तवला आहे. रविवारी दिल्ली आणि हरियाणाच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.  त्याचबरोबर महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्य आणि त्याच्या लगतच्या भागात येत्या चार दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

राजस्थानमध्ये, गेल्या 24 तासांत पूर्व राजस्थानमधील झालावाड, ढोलपूर आणि कोटा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस झालावाडच्या खानापूरमध्ये 72 मिमी तर बिकानेर शहरात 64 मिमी इतका झाला. येत्या 24 तासांत अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.

English Summary: rain update imd gave alert to maharashtra Published on: 10 July 2022, 08:36 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters