1. बातम्या

शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याची गरज

KJ Staff
KJ Staff


हवामान बदलामुळे शेती पुढे अनेक समस्‍या निर्माण झाल्‍या आहेत, शेतीतील उत्‍पादन खर्च वाढत आहे, परंतु त्‍याप्रमाणात उत्‍पादन वाढ होत नसुन, शेतीतील प्रत्‍यक्ष नफा कमी होत आहे. शेतकऱ्यांच्या समृध्‍दीसाठी शेतकरी, शासन, कृषी विभाग व कृषी विद्यापीठ यांनी एकत्रित काम करण्‍याची गरज असल्‍याचे प्रतिपादन पुणे येथील महाराष्‍ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्‍यक्ष मा. ना. खा. अॅड. संजयरावजी धोत्रे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग (महाराष्‍ट्र शासन) यांचे संयुक्‍त विद्यमाने मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनानिमित्‍त दिनांक 17 सप्‍टेबर रोजी आयोजित रबी शेतकरी मेळाव्‍याच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू माडॉअशोक ढवण हे होते तर प्रमुख अतिथी म्‍हणुन पुणे येथील कृषि तंत्रज्ञान उपयोजन संशोधन संस्‍थेचे संचालक माडॉलाखन सिंग यांची उपस्थिती होतीव्‍यासपीठावर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य माश्रीअजय गव्‍हाणेमाश्रीबालाजी देसाईमाश्री लिंबाजी भोसलेजिल्‍हा परिषद उपाध्‍यक्षा श्रीमती भावनाताई नखातेविस्‍तार शिक्षण संचालक डॉ. पी. जी. इंगोलेजिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी श्रीबी. आर. शिंदेसंशोधन संचालक डॉ. डि. पी. वासकरशिक्षण संचालक डॉ. व्‍ही. डि. पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मा. ना. अॅड. संजयरावजी धोत्रे पुढे म्‍हणाले की, अनेक शेतकरी संशोधक आहेत, आपआपल्‍या परिस्थितीनुसार शेतीतील शेतकऱ्यांचे अनेक प्रयोग यशस्‍वी झाले आहेत. यावर्षी कापसावरील गुलाबी बोंडअळी व्‍यवस्‍थापनाबाबत कृषी विभाग व कृषी विद्यापीठांनी मोठी जागृती केली, त्‍यामुळे मोठया प्रमाणात कामगंध सापळे शेतकऱ्यांनी लावल्‍यामुळे सद्यस्थितीत गुलाबील बोंडअळी नियंत्रणात आहे. आपण बऱ्यापैकी अन्‍नसुरक्षाचे उष्द्दिट साध्‍य करू शकलो, आज गरज आहे, ती पौष्टिक अन्‍न सुरक्षेची. परभणी कृषी विद्यापीठाने लोह व झिंक याचे प्रमाण अधिक असलेले ज्‍वारीचे परभणी शक्‍ती नावाचे वाण निश्चितच उपयुक्‍त आहे. सद्यस्थिती सोयाबिनवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. शेतकऱ्यांच्या पिक नुकसानीच्या सर्व्‍हेक्षणासाठी रीमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्‍याची गरज आहे. शेतकऱ्यापुढे शेतमाल बाजारपेठेचा मोठा प्रश्‍न आहे, यासाठी शेतमाल प्रक्रिया क्षेत्रात काम करण्‍याची गरज असुन फुलशेती, औषधी वनस्‍पती लागवडीस मोठा वाव आहे.


अध्‍यक्षीय समारोपात कुलगुरू मा
डॉअशोक ढवण म्‍हणाले कीहवामान बदलाच्‍या पार्श्‍वभुमीवर आज शेतीत अनेक समस्‍या निर्माण होत आहेतएक समस्‍या संपत नाही की,दुसरी नवी समस्‍या शेती पुढे उभी राहत आहेशेतमाल बाजारपेठाचा मोठा प्रश्‍न असुन एक मजबुत बाजार व्‍यवस्‍था आपणास निर्माण करावी लागेलतसेच शेतकरी उत्‍पादक कंपन्‍याच्‍या माध्‍यमातुन आपण काही प्रमाणात मात करू शकतोजे विकते तेच पिकविण्‍याची गरज आहे. शेतकऱ्यांपर्यंत कृषी तंत्रज्ञान पोहोचविण्‍यासाठी विद्यापीठ माहिती तंत्रज्ञानाचा मोठया प्रमाणात वापर करीत असुन प्रसार माध्‍यमांची मोठी साथ विद्यापीठास लाभत आहेअसे प्रतिपादन त्‍यांनी केले.

माडॉलाखन सिंग आपल्‍या भाषणात म्‍हणाले कीपरभणी कृषी विद्यापीठाने निर्माण केलेले सोयाबिन पिकांचे वाणाचा मोठया प्रमाणात शेतकरी अवलंब करीत असुन शेतकरी त्‍यापासुन चांगले उत्‍पादन घेत आहेतमराठवाडयातील कोरडवाहु शेतीत सुक्ष्‍मसिचंन पध्‍दतीचा वापर वाढविण्‍याची गरज आहेहवामान अंदाजात अचुकता आणण्‍यासाठी प्रयत्‍न करावे लागतीलअसे प्रतिपादन त्‍यांनी केले.

कार्यक्रमात श्रीमती भावनाताई नखाते यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. पी. जी. इंगोले यांनी केलेसुत्रसंचालन डॉ सुनिता काळे यांनी केले तर आभार विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ. पी. आर. देशमुख यांनी मानलेयाप्रसंगी कृषि तंत्रज्ञानावर आधारित विविध दालनाचा समावेश असलेल्‍या कृषी प्रदर्शनीचे उदघाटन व विद्यापीठ विकसित रब्बी पिकांच्‍या बियाणे विक्रीचे उदघाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आलेविद्यापीठ प्रकाशित शेतीभाती मासिक व विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित विविध पुस्‍तिका व घडीपुस्‍तीकेचे विमोचन करण्‍यात आलेतांत्रिक चर्चासत्रात रब्बी पिक लागवडपिकांवरील किड-रोग व्‍यवस्‍थापन आदीवर विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन केलेमेळाव्‍यास शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters