अनेकदा वेगवेगळी कामे सुरु असताना जे करायचे नव्हते तेच होते. असेच काहीसे आता झाले आहे. आता वसमत तालुक्यातील (Vasmat) चोंढी स्टेशनकडून (Chondhi Station) कुरुंद्याकडे जाण्यासाठी रेल्वे विभागाच्यावतीने रेल्वे मार्गाखाली भुयारी पूल (Underground bridge under railway line) बांधण्यात आला आहे. नागरिकांचा वेळ वाचावा म्हणून हे काम हाती घेण्यात आले होते.
असे असताना मात्र या पुलाचे काम असे काही केले आहे की, हा भुयारी मार्ग आहे की स्वीमिंग पूल आहे असा सवाल आता प्रवाशांसह परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. या भुयारी पुलात 20 फुटापर्यंत पाणी साचले आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू आहे. सध्या या भुयारी मार्गात पाणीच पाणी झाले आहे.
या भुयारी मार्गातील पाण्यामुळे वाहन चालकांसह विद्यार्थी व शेतकरी, दुधवाले यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे हा पूल व्यवस्थित करण्याची मागणी केली जात आहे. शेतात जाण्यासाठी जास्त वेळ लागत असल्याने आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याने हा रस्ता तात्काळ मोकळा करुन देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांना रस्त्यामुळे शेतीच्या कामामध्ये फटका बसत असल्याने रेल्वे विभागावर टीका केली जात आहे.
CNG-PNG च्या किमती पुन्हा मोठी कपात, गौतम अदानी यांची मोठी घोषणा..
असे असताना वसमतचे तहसीलदार अरविंद बौळगे यांनी पत्रव्यवहार करून राज्य शासनाकडून परवानगीही घेतली होती. आता मात्र रेल्वे विभागाकडून परवानगी देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. यामुळे आता मोठे नुकसान होत आहे. सध्या रेल्वे आल्यानंतर ज्या वेळी फाटक पाडले जाते त्यावेळी पुन्हा काही काळ नागरिकांना तिथेच अडकून बसावे लागत आहे.
तरुणांनो मोठ्या प्रमाणावर दारू प्या!! सरकारनेच केले आवाहन, वाचा काय आहे कारण...
सध्या त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याने हा रस्ता तात्काळ मोकळा करुन देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यामुळे आता रेल्वे प्रशासन काय निर्णय घेणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
आता कोणाकडे न्याय मागायचा? सरेंडर होण्यास सांगितलेला मंत्रीच बिहारमध्ये बनला कायदामंत्री
काय करायचे या भरमसाठ फी घेणाऱ्या खाजगी शाळेचे? फी न भरल्यामुळे शिक्षकाची विद्यार्थाला जबर मारहाण, विद्यार्थ्याचा मृत्यू..
आता वाढीव वीज बिलाची कटकटच मिटली! जेवढे पैसे भराल तेवढीच वीज मिळणार
Share your comments